Kangana Ranaut: ‘बेबी रनौतच्या प्रतीक्षेत’, वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या कंगना रनौतने चाहत्यांना दिली ‘गुडन्यूज’
कंगना रनौत हिने चाहत्यांना दिली 'गुडन्यूज', कुटुंबात उत्साहाचं वातावरण... मोठ्या सोहळ्यासाठी रनौत कुटुंब सज्ज... नेहमी वादाच्या भोवऱ्यात राहणारी कंगना आता का आली आहे चर्चेत?

मुंबई | 24 जुलै 2023 : अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. वादग्रस्त मुद्द्यांवर स्वतःचं परखड मत मांडत अभिनेत्री कायम चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. एवढंच नाही तर, बॉलिवूडच्या अन्य सेलिब्रिटींबद्दल मोठं वक्तव्य अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून करत असते. कायम वादाचा मुकूट घेवून मिरवणाऱ्या कंगनाने आता मात्र चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. कंगना हिच्या कुटुंबात लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. सध्या अभिनेत्रीने पोस्ट केलेल्या फोटोंची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगत आहे. एवढंच नाही तर, चाहते देखील अभिनेत्रीला शुभेच्छा देत आहेत.
कंगना लवकरच आत्या होणार आहे. कंगना हिची वहिनी लवकरच बाळाला जन्म देणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रनौत कुटुंबाची चर्चा रंगत आहे. नुकताच. कंगनाच्या वहिनीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमात कंगना हिची आई आणि पूर्ण कुटुंब उपस्थित होतं. महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्रीने वहिनीला महागडं गिफ्ट देखील दिलं आहे.
कंगना हिच्या वहिनीचं नाव रितू आहे. तीन वर्षांपूर्वी अभिनेत्रीचा भाऊ अक्षत रनौत आणि रितू रनौत यांनी लग्न केलं. लग्नाच्या तीन वर्षांनंतर अक्षत आणि रितू यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. सध्या सर्वत्र रनौत कुटुंबाची चर्चा रंगत आहे.
View this post on Instagram
कंगनाा रनौत हिने वहिनी रितू हिच्यासोबत जवळपास १० फोटो पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये कंगना गुलाबी रंगाच्या साडीत दिसत आहे. तर अभिनेत्रीच्या आईने पिवळ्या रंगाचा सूट घातला आहे. होणाऱ्या आईने लाल रंगाची साडी नेसली आहे. कंगनाने वहिनीला महागडा नेकलेस गिफ्ट म्हणून दिला आहे.
कुटुंबासोबत अनेक फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘प्रचंड अमुल्य क्षण मी तुमच्यासोबत शेअर करत आहे.. आम्ही प्रत्येक जण आता बेबी रनौतच्या प्रतीक्षेत आहोत… तुम्ही दिलेलं प्रेम आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद…’ असं म्हणाली आहे.
कंगना रनौत हिच्या सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री २०२२ मध्ये ‘धडक’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आली. अभिनेत्रीचा आगामी सिनेमा ‘इमर्जन्सी’चं शुटिंग पूर्ण झालं आहे. सिनेमात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. सिनेमा २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आता चाहते सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.