मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. विषय कोणताही असो कंगना राणावत आपले मत मांडताना अजिबात काही विचार करत नाही. कंगना राणावत हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही बघायला मिळते. कंगना राणावत हिच्या निशाण्यावर कायमच काही बाॅलिवूड कलाकार आणि चित्रपट निर्माता असतात. काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूर याच्यावर टिका करताना कंगना राणावत ही दिसली होती.
करण जोहर आणि कंगना राणावत यांच्यामध्ये तर मोठा वाद सुरूवातीपासूनच बघायला मिळतो. गेल्या काही दिवसांपासून सनी देओल हा त्याच्या गदर 2 या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. विशेष म्हणजे सनी देओल याचा गदर 2 हा चित्रपट धमाका करताना दिसत आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सनी देओल आणि अमीषा पटेल हे दिसले होते.
गदर 2 चित्रपटाने कमाईमध्ये मोठा धमाका करण्यास सुरूवात केली आहे. गदर 2 चित्रपट धमाका करत असतानाच सनी देओल याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. सनी देओल याचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून अनेकांनी त्याला टार्गेट करण्यास देखील सुरूवात केली. बऱ्याच लोकांना सनी देओल याचे व्हिडीओमधील वागणे अजिबातच आवडले नाही.
Never seen 1st gen stars ever behave such. It’s always the star-kids who have grown up with fame & privilege who take this love for granted. Be it SRK or Amitabh. Always grateful. pic.twitter.com/HMlNeRyEiv
— Gabbar (@GabbbarSingh) August 18, 2023
या व्हिडीओमध्ये सेल्फी घेण्यासाठी आलेल्या चाहत्यावर भडताना सनी देओल हा दिसला आणि त्याच्यावर मोठ्याने ओरडला. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्काच बसला आणि चाहत्यासोबत अशाप्रकारे वागणे चुकीचे असल्याचे अनेकांनी म्हटले. मात्र, आता सनी देओलच्या या व्हिडीओला सपोर्ट करताना चक्क कंगना राणावत ही दिसली आहे.
या व्हिडीओवर कंगना राणावत हिने लिहिले की, अशी कोणतीही घटना कोणाच्याही हेतूचे सूचक असू शकत नाही आणि सेल्फी घेणे हे तर खूपच भयानक आहे. लोक खूप जास्त जवळ येतात आणि सर्व प्रकारचे विषाणू देऊन जातात. प्रेमाच्या अनेक भाषा आहेत. फक्त सेल्फी आणि भेटणेच नाही. आता कंगनाची ही पोस्ट व्हायरल होत आहे.