Kangana Ranaut अडकणार विवाहबंधनात! अभिनेत्रीचा लग्न पत्रिका वाटताना व्हिडीओ व्हायरल

कंगना रनौत हिच्या घरी वाजणार सनई-चौघडे? अभिनेत्रीचा लग्न पत्रिका वाटताना व्हिडीओ व्हायरल... सर्वत्र कंगना रनौत हिच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Kangana Ranaut अडकणार विवाहबंधनात! अभिनेत्रीचा लग्न पत्रिका वाटताना व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Jun 14, 2023 | 1:04 PM

मुंबई | अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अनेक सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेली अभिनेत्री आता लग्न करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री लग्न पत्रिका वाटत आहे.. अशा चर्चा रंगत आहे. अभिनेत्रीच्या व्हिडीओ चाहते आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. सध्या सर्वत्र कंगनाच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे. तर अनेक चाहते कंगनाला कोणासोबत लग्न करणार आहेस? असा प्रश्न विचारत आहे. व्हिडीओ पाहून अभिनेत्रीचे चाहते देखील थक्क झाले आहेत.

सध्या कंगना लग्नाचे कार्ड वाटत असल्याच्या चर्चांना उधाण आवं आहे.. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री नव्या नवरी प्रमाणे सजलेली दिसून येत आहे. दरम्यान अभिनेत्री घराबाहेर निघते.. कारमध्ये बसलेल्या कंगनाला पापाराझींना विचारते एवढा गोंधळ का आहे, यावर पापाराझी कंगनाला विचारतात, ‘तू लग्न करत आहे.. ही गोष्ट खरी आहे…’

पापाराझींच्या प्रश्नाचं उत्तर देत अभिनेत्री म्हणते, ‘बातम्या तर तुम्ही पसरवतात…मी तर फक्त आनंदाच्या बातम्या देते..’ त्यानंतर अभिनेत्री एक कार्ड देते आणि सर्वांना आमंत्रण देते… सध्या अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक जण हैराण देखील झाले आहेत…

व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘अखेर टीकू वेड्स शेरू येणार’, तर दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘येणार आहे आपली टीकू’, अन्य एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘तनू वेड्स मनू सिनेमाचं प्रमोशन आहे असं वाटत आहे…’ त्यामुळे नक्की प्रकरण काय? हे कंगनाच्या भूमिकेनंतर स्पष्ट होईल..

हा व्हिडिओ पाहून कंगनाचे चाहते अंदाज लावत आहेत की, अभिनेत्री तिच्या पुढच्या सिनेमातून पुनरागमन करणार आहे. कंगना रनौत लवकरच तिचा टिकू वेड्स शेरू घेऊन येणार आहे. या सिनेमात अभिनेत्रीसोबत नवाजुद्दीन सिद्दीकी दिसणार आहे. सिनेमात अभिनेत्री अवनीत कौर देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे महत्त्वाचं म्हणजे सिनेमात नवाज अवनीत हिच्यासोबत फ्लर्ट करताना दिसणार आहे.

अभिनेत्री कंगना रनौत कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अनेक सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेली कंगना सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते. वादाचा मुकूट कायम आपल्या डोक्यावर घेवून मिरवणारी अभिनेत्री कंगना कायम प्रसिद्ध सेलिब्रिटींवर निशाणा साधताना दिसते. पण आता कंगना लग्नाच्या चर्चांमुळे प्रसिद्धी झोतात आली आहे..

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.