Parineeti Chopra नंतर कंगना रनौत अडकणार विवाहबंधनात! प्रसिद्ध अभिनेत्याचा दावा

Kangana Ranaut | श्रीमंत उद्योजकासोबत अभिनेत्री कंगना रानौत एप्रिल २०२४ मध्ये अडकणार विवाहबंधनात! प्रसिद्ध अभिनेत्याकडून मोठा खुलासा... कोण आहे कंगना रनौत हिचा होणार पती? सध्या अभिनेत्री खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत... नक्की काय आहे सत्य...

Parineeti Chopra नंतर कंगना रनौत अडकणार विवाहबंधनात! प्रसिद्ध अभिनेत्याचा दावा
Follow us
| Updated on: Sep 25, 2023 | 10:15 AM

मुंबई : 25 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री कंगना रानौत कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कायम वादाचा मुकुट आपल्या डोक्यावर मिरवणारी कंगना वादाच्या भोवऱ्यात अडकलेली असते. अनेकदा कंगना वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत आली. पण आता कंगना तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना रानौत हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रा हिच्यानंतर कंगना लग्नबंधनात अडकणार असल्याचा दावा एका प्रसिद्ध अभिनेत्याने ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. शिवाय कंगना उद्योजकासोबत लग्न करणार असल्याचा दावा देखील अभिनेत्याने केला आहे. ज्यामुळे कंगना हिचं खासगी आयुष्य चव्हाट्यावर आलं आहे.

कंगना रनौत हिच्या खासगी आयुष्याचा मोठा खुलासा करणारा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून कमाल राशिद खान उर्फ केआरके आहे. कंगना एप्रिल २०२४ मध्ये लग्न बंधनात अडकणार असल्याचा दावा अभिनेत्याने ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या ट्विटची चर्चा रंगली आहे…

केआरके ट्विट करत म्हणाला, ‘अभिनेत्री कंगना रनौत हिचा साखरपुडा डिसेंबर २०२३ मध्ये उद्योजकासोबत होणार आहे. एप्रिल २०२४ मध्ये कंगना विवाहबंधनात अडकणार आहे…! तिला खूप शुभेच्छा…!’ अभिनेत्याच्या ट्विटवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत… पण यावर कंगना हिने कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही…

लग्नाबद्दल काय म्हणाली कंगना रनौत?

एका मुलाखतीत कंगना रनौत हिने लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. ‘प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते आणि ती माझ्या आयुष्यात येणार असेल तर येईल.. मला लग्न करायचं आहे. माझं कुटुंब असेल अशी माझी देखील इच्छा आहे.. पण सर्व काही योग्य वेळ आल्यानंतर होईल…’ असं अभिनेत्री म्हणाली होती..

कंगना रनौत हिचे आगामी सिनेमे

कंगना रनौत हिच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच ‘चंद्रमुखी २’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. शिवाय अभिनेत्री ‘तेजस’ सिनेमा देखील २० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. एवढंच नाही तर, ‘इमरजेन्सी’ सिनेमात देखील कंगना महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.