शाहरुख खानच्या मुलासाठी कंगना रणौतची पोस्ट; म्हणाली, ‘फिल्मी कुटुंबातील मुलं फक्त मेकअप, वजन…’

Shah Rukh Khan Son: 'फिल्मी कुटुंबातील मुलं फक्त मेकअप, वजन...', कंगना रणौत यांची शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासाठी पोस्ट, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना हिच्या पोस्टची चर्चा...

शाहरुख खानच्या मुलासाठी कंगना रणौतची पोस्ट; म्हणाली, 'फिल्मी कुटुंबातील मुलं फक्त मेकअप, वजन...'
Follow us
| Updated on: Nov 20, 2024 | 11:49 AM

Shah Rukh Khan Son: अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता देखील कंगना त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. यावेळी कंगना यांनी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. आर्यनसाठी पोस्ट करत कंगना यांनी किंग खानच्या मुलाचं कौतुक आणि शुभेच्छा दिल्या आहे. सध्या सर्वत्र कंगना राणौत यांच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, शाहरुख खान याचा मुलगा आर्यन दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. नेटफ्लिक्सवर लवकरच आर्यन खान याचा पिहिला सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आर्यन खान याला फक्त कंगना हिनेच नाही तर, सुहाना खान, अनन्या पांडे, शनाया कपूर आणि करण जोहर यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहे. पण कंगनाच्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आर्यनसाठी पोस्ट करत कंगना म्हणाल्या, ‘एका चांगली गोष्ट आहे, ती म्हणजे फिल्मी कुटुंबातील मुलं मेकअप करून, वजन कमी करून… पूर्णपणे तयार होवून स्वतःला अॅक्टर्स समजतात. पण आर्यन काही वेगळं करत आहे. आपल्या सर्वांना मिळून भारतीय सिनेमाचा दर्जा उच्च स्थरावर पोहोचवायचा आहे… वेळे सुद्धा हिच गरज आाहे… ज्यांच्याकडे साधन आहे, ते कायम सोपा मार्ग निवडतात…’

हे सुद्धा वाचा

‘आपल्याला कॅमेऱ्याच्या पाठी असणाऱ्या लोकांची गरज आहे. आर्यन खान याने पडद्यामागचा मार्ग निवडला आहे. एक लेखक आणि दिग्दर्शक म्हणून त्याच्या पदार्पणाची प्रतीक्षा राहिल…’ असं म्हणत कंगना हिने आर्यन खानचं कौतुक केलं आहे.

आर्यन खानसाठी बहीण सुहाना खान हिची पोस्ट…

भावाला पुढच्या प्रवासाच्या शुभेच्छा देत सुहाना खान म्हणाली, ‘प्रचंड आनंद ड्रामा, अॅक्शन आणि थोड्या अडचणी… ज्या कायम तुझ्या सोबत असतात, आर्यन आता प्रतीक्षा करु शकत नाही… खूप गर्व आहे…’ असं म्हणत सुहाना हिने देखील आर्यनला शुभेच्छा दिल्या आहेत.

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर याने देखील आर्यनला शुभेच्छा दिल्या आहेत. आर्यन म्हणाला, ‘आर्यनसाठी खूप प्रेम… मला तुझ्यावर खूप खूप गर्व आहे आणि प्रतीक्षा राहिल की जग तुझी सीरिज पाहिल…’ असं करण म्हणाला.

आर्यन खान याच्या सीरिजबद्दल सांगायचं झालं. आर्यन खान पहिली सीरिज 2025 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. सीरिजचं शिर्षक अद्याप ठरलेलं नाही… पण चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.