सारा अली खान हिच्यासोबत ‘ही’ भूमिका साकारण्यास करीना कपूर खान तयार, मोठा खुलासा
सारा अली खान ही कायमच चर्चेत असते. सारा अली खान हिचा काही दिवसांपूर्वीच जरा हटके जरा बचके हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाने धमाका केला. आता नुकताच करीना कपूर खान हिने सारा अली खान हिच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा हा केला आहे. ज्यानंतर विविध चर्चा रंगल्या आहेत.
मुंबई : कॉफी विथ करण सीजन 8 तूफान चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच शोमध्ये रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण हे पोहचले होते. विशेष म्हणजे यांनी काही खुलासे केले. रणवीर आणि दीपिका यांच्यानंतर आता शोमध्ये आलिया भट्ट आणि करीना कपूर खान पोहचल्या आहेत. विशेष म्हणजे याचे काही व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. सारा अली खान हिच्यासोबतच्या नात्यावर बोलताना देखील करीना कपूर खान ही दिसलीये. करण जोहर याने यावेळी करीना कपूर खान हिला मोठा प्रश्न देखील केला.
करीना कपूर हिला थेट विचारण्यात आले की, चित्रपटामध्ये तुला सारा अली खान हिच्या आईची भूमिका करायला आवडले का? यावर करीना कपूर थेट म्हणाली की, का नाही आवडणार? मी एक अभिनेत्री आहे आणि मी कोणतेही पात्र साकारू शकते आणि मला ते नक्कीच आवडले. मला प्रत्येक वयोगटामधील भूमिका करायला देखील आवडते.
यावर करण म्हणतो की, म्हणजे यासाठी तू तयार आहेस? करीना कपूर म्हणते की, होय मी अभिनयासाठी कायमच तयार असते. म्हणजेच काय तर भविष्यामध्ये एखाद्या चित्रपटात करीना कपूर ही सारा अली खान हिच्या आईची भूमिका ही नक्कीच साकारू शकते. करीना कपूर खान ही सारा अली खान हिची सावत्र आहे. सारा आणि करीना यांच्यामध्ये चांगलेच नाते असल्याचे सांगितले जाते.
आलिया भट्ट हिने देखील यावेळी मोठे खुलासे केले. आलिया भट्ट आणि करीना कपूर खान या खूप जास्त चांगल्या मैत्रिणी आहेत. काही दिवसांपूर्वीच करीना कपूर आणि आलिया भट्ट यांनी खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर करत म्हटले होते की, आमच्या दोघींना एकाच चित्रपटासाठी कोणी कास्ट करेल का? यावर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसले.
काही दिवसांपूर्वीच आलिया भट्ट ही मुलगी राहा हिला सोबत घेऊन करीना कपूर खान हिच्या घरी पोहचली होती. विशेष म्हणजे आलिया आणि राहा यांना सोडण्यासाठी चक्क तैमुर हा खाली आला होता. याचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. करीना कपूर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.