मुंबई : विकी कौशल आणि कतरिना कैफ हे बाॅलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असणारे एक कपल आहे. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये कतरिना कैफ ही मोठा खुलासा करताना दिसली. मात्र, कतरिना कैफ हिचे हे बोलणे ऐकून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळाले. कतरिना कैफ हिने स्पष्टपणे सांगितले की, एकाच घरात राहत असूनही मी आणि विकी एकमेकांना भेटू देखील शकत नाहीयेत. कतरिना कैफ हिचे हे बोलणे ऐकून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळाले. कतरिना कैफ हिने याचे कारणही थेट सांगून टाकले आहे.
कतरिना कैफ म्हणाली की, मी माझ्या टायगर 3 चित्रपटामध्ये आणि विकी कौशल हा त्याच्या सॅम बहादुर चित्रपटामध्ये व्यस्त आहे. दोघेही चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये बिझी असल्याने अजिबातच वेळ मिळत नाही. मात्र, असेही नाही की, आम्ही एकमेकांना मिस करत नाही. दोघेही आम्ही एकमेकांना प्रचंड मिस करतो. परंतू वेळच नाहीये.
म्हणावा तसा वेळ देता येत नाही. पुढे कतरिना कैफ म्हणाली की, एकच गोष्ट चांगली आहे की, आम्ही किमान दिवाळी तरी एकसोबत साजरी केली. कतरिना कैफ हिने केलेल्या या विधानाची जोरदार चर्चा सातत्याने सुरू आहे. सॅम बहादुर या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळत आहे. यावर कतरिना कैफ हिने देखील भाष्य केले आहे.
कतरिना कैफ ही म्हणाली की, सॅम बहादुर हा चित्रपट बघण्यासाठी मी खूप जास्त उत्साही आहे. विकी कौशल याने सॅम बहादुर चित्रपटात धडाकेबाज कामगिरी केलीये. तो जबरदस्त भूमिकेत दिसणार आहे. मी या चित्रपटाची वाट पाहत आहे. सॅम बहादुर या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठे क्रेझ हे बघायला मिळत आहे. हा चित्रपट धमाका करणार असेही सांगितले जात आहे.
दुसरीकडे कतरिना कैफ हिचा दिवाळीच्या दिवसीच रिलीज झालेला टायगर 3 हा चित्रपट चांगलीच कामगिरी करताना दिसतोय. विशेष म्हणजे या चित्रपटाची ओपनिंगच धमाकेदार ठरली. टायगर 3 चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ हे मुख्य भूमिकेत दिसले. विशेष म्हणजे अजूनही हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर चांगलाच धमाका करताना दिसत आहे.