ती आई होणार…? कतरिना कैफ हिने काय सांगितलं?; ‘ती’ पोस्ट तुफान व्हायरल
बाॅलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ ही कायमच चर्चेत असते. कतरिना कैफची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. कतरिना कैफ हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. कतरिना कैफ आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन नक्कीच आहे. कतरिनाने एक पोस्ट शेअर केलीये.
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. कतरिना कैफ हिची सोशल मीडियावर मोठी फॅन फाॅलोइंग आहे. कतरिना कैफ हिने बाॅलिवूड अभिनेता विकी काैशल याच्यासोबत 9 डिसेंबर 2021 मध्ये राजस्थानच्या सवाई माधोपुरमध्ये लग्न केले. कतरिना कैफ आणि विकी काैशल यांचा विवाहसोहळा अत्यंत शाही पद्धतीने पार पडला. या लग्नाचे काही खास फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. कतरिना कैफ आणि विकी काैशल यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केले आणि मग लग्न केले.
विकी काैशल याचा काल 36 वा वाढदिवस झालाय. विकी काैशल हा लंडनमध्ये आपल्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी पोहचला. यावेळीचे काही फोटोही व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोमध्ये विकी हा एका रेस्टॉरंट मध्ये बसलेला दिसतोय. एकून तीन फोटो कतरिनाने शेअर केले. त्याने पांढऱ्या रंगाचे टिशर्ट घातले असून त्याच्यासमोर एक केक दिसतोय. हॅप्पी बर्थडे देखील लिहिण्यात आलंय.
दुसऱ्या फोटोमध्ये विकी काैशल हा खिडकीजवळ बसल्याचे बघायला मिळतंय. हे फोटो शेअर करत कतरिना कैफ हिने तीन पांढऱ्या रंगाच्या इमोजी देखील शेअर केल्या आहेत. यावरूनच आता विविध चर्चा रंगताना दिसत आहे. अनेकांनी थेट कतरिना कैफ ही प्रेग्नंट आहे. लोक सतत या पोस्टवर कमेंट करत आहेत.
View this post on Instagram
एकाने म्हटले की, या इमोजीनंतर हे नक्की आहे की, यांची फॅमिली वाढत असून तिसऱ्या व्यक्तीचे यांच्या कुटुंबात आगमन होत आहे. दुसऱ्याने लिहिले की, नक्कीच कतरिना कैफ ही प्रेग्नंट आहे. तिसऱ्याने लिहिले की, विकीच्या बर्थडेच्या दिवशी कतरिनाने चाहत्याना मोठी हिंट नक्कीच दिलीये. लवकरच यांच्या कुटुंबात नव्या सदस्याचे आगमन होतंय.
कतरिना कैफ हिने शेअर केलेली ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसतंय. लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करून विकी काैशल याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. कतरिना कैफ आणि विकी काैशल लंडनमध्ये वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. कतरिना कैफ आणि विकी काैशल सोशल मीडियावर कायमच एकमेकांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात.