Kiara Advani | प्रचंड मोठी आहे किआरा अडवाणी हिच्या अफेअर्सची लिस्ट; अखेर सिद्धार्थशी केलं लग्न

आपल्या सौंदर्याने सर्वांना घायाळ करणाऱ्या किआरा अडवाणी हिने 'या' प्रसिद्ध सेलिब्रिटींना केलं आहे डेट... अखेर शाही थाटात सिद्धार्थ मल्होत्राशी केलं लग्न...

Kiara Advani | प्रचंड मोठी आहे किआरा अडवाणी हिच्या अफेअर्सची लिस्ट; अखेर सिद्धार्थशी केलं लग्न
Follow us
| Updated on: Jul 31, 2023 | 10:58 AM

मुंबई | 30 जुलै 2023 : अभिनेत्री किआरा अडवाणी (kiara advani) अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या यादीत किआरा अव्वल स्थानी आहे. ‘कबीर सिंग’ आणि ‘शेरशाह’ सिनेमामुळे किआरा हिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. पण बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना अभिनेत्रीच्या आयुष्यात अनेक सेलिब्रिटींची एन्ट्री झाली. पण कोणासोबतही अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही. अखेर ७ फेब्रुवारी रोजी अभिनेत्री किआरा अडवाणी (kiara advani) आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (sidharth malhotra) यांनी लग्न केलं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सिद्धार्थ – किआरा विवाहबंधनात अडकले आणि दोघांनी स्वतःची प्रेम कहाणी पूर्ण केली.

पण सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यासोबत लग्न करण्यापूर्वी किआरा हिने अनेकांना डेट केलं आहे. किआरा हिने अभिनेता मुस्तफा बर्मावाला याला देखील डेट केलं आहे. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. दोघांच्या नात्याची चर्चा देखील वाऱ्यासारखी पसरली होती. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरल्यानंतर दोघांनी एक वर्षानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

किआरा हिच्या नावाची चर्चा अभिनेता वरुण धवण याच्यासोबत देखील रंगली. ‘जुग जुग जियो’ सिनेमानंतर वरुण – किआरा यांच्यातील नातं धट्ट झालं होतं. पण दोघांनी रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा असल्याचं सांगितलं. तेव्हा वरुण पत्नी नताशा दलाल हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता.

अभिनेता मोहित मारवाह याच्यासोबत देखील अभिनेत्री रिलेशनशिपमध्ये होती. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर मोहित आणि किआरा यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला… अनेक अभिनेत्यांसोबत रिलेशनशिपची चर्चा रंगल्यानंतर किआरा हिच्या आयुष्यात सिद्धार्थ याची एन्ट्री झाली.

किआरा अडवाणी – सिद्धार्थ मल्होत्रा गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. पण त्यांचं नातं कधीही समोर आलं नाही. पण जेव्हा ‘शेरशाह’ सिनेमातून दोघे प्रेक्षकांच्या भोटीस आले, तेव्हा चाहत्यांनी दोघांच्या जोडीला डोक्यावर घेतलं. ‘शेरशाह’ सिनेमातील दोघांची केमिस्ट्री चहत्यांना प्रचंड आवडली.

किआरा अडवाणी – सिद्धार्थ मल्होत्रा यांनी जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये सप्तपदी घेतल्या. लग्नानंतर दोघांनी फोटो पोस्ट करत चाहत्यांनी आनंदाची बातमी दिली. एवढंच नाही तर, लग्नानंतर देखील सिद्धार्थ किआरा कायम सोशल मीडियावर एकमेकांसोबत फोटो पोस्ट करत चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. सध्या सर्वत्र किआरा हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.