Kriti Sanon | क्रिती सनॉन हिने केला मोठा खुलासा, म्हणाली, बाॅलिवूड चित्रपटांमध्ये काम मिळवण्यासाठी अगोदर
क्रिती सनॉन हिचा काही दिवसांपूर्वीच आदिपुरुष हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे आदिपुरुष चित्रपटामध्ये क्रिती सनॉन ही माता सीतेच्या भूमिकेत होती. मात्र, या चित्रपटावर जोरदार टिका झाली. इतकेच नाही तर सतत लोक या चित्रपटाला विरोध करताना देखील दिसले.
मुंबई : क्रिती सनॉन ही काही दिवसांपूर्वीच आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटामध्ये दिसली. विशेष म्हणजे आदिपुरुष चित्रपटामध्ये ती माता सीतेच्या भूमिकेत होती. आदिपुरुष चित्रपटात क्रिती सनॉन हिच्यासोबत प्रभास हा मुख्य भूमिकेत होता. क्रिती सनॉन (Kriti Sanon) आणि प्रभास हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वीच रंगली होती. इतकेच नाही तर क्रिती सनॉन हिच्याबद्दल प्रश्न विचारताच प्रभास हा लाजताना देखील दिसला होता. मध्यंतरी चर्चा होती की, लवकरच क्रिती सनॉन आणि प्रभास (Prabhas) हे लग्न बंधनात अडकणार आहेत. विशेष म्हणजे प्रभास याच्या घरच्यांना देखील क्रिती सनॉन ही आवडली आहे.
क्रिती सनॉन आणि प्रभास यांच्या लग्नाची चाहते हे आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. नुकताच क्रिती सनॉन हिने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये क्रिती सनॉन हिने काही मोठे खुलासे केल्याचे देखील दिसत आहे. क्रिती सनॉन म्हणाली की, ज्यावेळी मी बाॅलिवूड क्षेत्रामध्ये यायचे ठरवले त्यावेळी काही नातेवाईकांनी विरोध केला.
क्रिती सनॉन पुढे म्हणाली की, नातेवाईकांचे म्हणणे होते, बाॅलिवूडमध्ये खूप जास्त स्पर्धा आहे. यामुळे लगेचच तुला काम मिळणे खूप जास्त अवघड आहे. इतकेच नाही तर मुंबईतून परत आल्यावर लग्न देखील होणार नाही लवकर. बाॅलिवूड क्षेत्र हे नव्या येणाऱ्या मुलींसाठी अजिबातच चांगले नसल्याचे देखील त्यांनी म्हटले.
क्रिती सनॉन म्हणाली, मुळात म्हणजे ज्यावेळी मी मुंबईमध्ये दाखल झाले. त्यावेळी मला काय करायचे हे काहीच माहिती नव्हते. त्यावेळी मुंबईमध्ये माझ्या ओळखीचे कोणीच नव्हते. चित्रपटामध्ये काम करण्यासाठी नेमके कोणाला भेटायचे काय करायचे याबद्दल मला काहीही माहिती नव्हती किंवा माझा तिथे संपर्क देखील नव्हता.
इतकेच नाही तर क्रिती सनॉन हिने थेट स्टार किड्सबद्दलची मोठे भाष्य हे केले आहे. आता क्रिती सनॉन ही तिच्या या मुलाखतीमुळे चर्चेत आहे. क्रिती सनॉन हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. नुकताच जीममध्ये व्यायाम करताना क्रिती सनॉन ही दिसली होती.
आपल्या चाहत्यांसाठी जीममध्ये व्यायाम करतानाचा एक व्हिडीओही क्रिती सनॉन हिने सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र, अनेकांनी या व्हिडीओनंतर क्रिती सनॉन हिला टार्गेट करण्यास सुरूवात केली होती. अनेकांना क्रिती सनॉन हिचा व्हिडीओ आवडला नाही. अनेकांनी पाहा ती सीता म्हणून तिला टार्गेट करण्यास सुरूवात केली.