Kriti Sanon | क्रिती सनॉन हिने सांगितला अंगावर थरकाप आणणार अनुभव, थेट म्हणाली, मी ढसाढसा रडले आणि पुढे
बाॅलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन ही सध्या तूफान चर्चेत आहे. क्रिती सनॉन हिला मिमी चित्रपटासाठी मोठा पुरस्कार हा मिळालाय. क्रिती सनॉन हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. क्रिती सनॉन हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन (Kriti Sanon) हिने 2014 पासून आपल्या करिअरला सुरूवात केली. यादरम्यान क्रिती सनॉन हिने अनेक चित्रपटांमध्ये हिट भूमिका केल्या. क्रिती सनॉन हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. विशेष म्हणजे क्रिती सनॉन ही सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय दिसते. काही दिवसांपूर्वीच जिममध्ये एक अवघड व्यायाम करताना क्रिती सनॉन ही दिसली. याचा व्हिडीओ (Video) तिने सोशल मीडियावर शेअर केला. क्रिती सनॉन हिचा काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला आदिपुरूष हा चित्रपट फ्लाॅप गेला.
विशेष म्हणजे क्रिती सनॉन हिचा आदिपुरूष हा चित्रपट अत्यंत बिग बजेटचा होता. आदिपुरूष चित्रपटांमध्ये क्रिती सनॉन ही माता सीतेच्या भूमिकेत दिसली. क्रिती सनॉन आणि प्रभास यांच्या अफेअरच्या चर्चा यादरम्यान तूफान रंगताना दिसल्या. इतकेच नाही तर इशाऱ्या इशाऱ्यामध्ये प्रभास याने क्रिती सनॉन हिला डेट करत असल्याचे देखील सांगून टाकले.
याचा मोठा खुलासा करण जोहरच्या शोमध्ये झाला. नुकताच क्रिती सनॉन हिला मिमी या चित्रपटासाठी थेट राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. हिरोपंती हा क्रिती सनॉन हिचा पहिला बाॅलिवूड चित्रपट आहे. क्रिती सनॉन हिने आपल्या करिअरमध्ये अनेक साऊथच्या चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत.
क्रिती सनॉन हिच्यासाठी या सर्व गोष्टी नक्कीच इतक्या सहज नव्हता. यासाठी तिने मोठा संघर्ष केलाय. क्रिती सनॉन हिने नुकताच मोठा खुलासा केला आहे. क्रिती सनॉन म्हणाली की, अभिनय क्षेत्रामध्ये येण्याच्या अगोदर माझा पहिला रॅंप शो होता. त्यावेळी माझ्याकडून थोडीसी गडबड झाली. मात्र, त्या कोरियोग्राफरने मला थेट 50 मॉडल्सच्या समोर खूप जास्त रागावले.
मी ढसाढसा रडत होते. मात्र, ती माझ्यावर ओरडत होती. मात्र, त्यानंतर मी कधीच त्या कोरियोग्राफरसोबत काम केले नाही. क्रिती सनॉन आणि प्रभास लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. इतकेच नाही तर मालदीवमध्ये क्रिती सनॉन आणि प्रभास यांचा साखरपुडा हा पार पडणार असल्याचे सांगितले जात जाते.
क्रिती सनॉन आणि प्रभास हे एकमेकांना डेट करत असल्याचे अनेक रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. चाहते यांच्या साखरपुड्याची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. अजूनही कधीच क्रिती सनॉन आणि प्रभास यांनी त्यांच्या नात्यावर भाष्य केले नाहीये. परंतू आदिपुरूष चित्रपटाच्या सेटवरच यांच्या लव्ह स्टोरीला सुरूवात झाल्याचे सांगितले जाते. करण जोहर याच्या शोमध्ये थेट प्रभास याला फोन करताना क्रिती सनॉन ही दिसली होती.