लारा दत्ताची लेक म्हणजे सौंदर्याची खाण, आईपेक्षाही सुंदर, दोघींचा व्हिडीओ पाहून म्हणाल…
Lara Dutta shares Daughter Saira Video: लारा दत्ताची लेक दिसते प्रचंड सुंदर, लेकीच्या सौंदर्यापुढे लारा फेल, दोघींचा व्हिडीओ पाहून चाहते चकित, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त लारा दत्ता आणि तिच्या लेकीच्या सौंदर्याची चर्चा..
Lara Dutta shares Daughter Saira Video: 2000 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकत चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. लारा आता बॉलिवूडपासून दूर असली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सांगायचं झालं तर, लारा हिने बॉलिवूडच्या प्रत्येक लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्यासोबत स्क्रिन शेअर केली आहे. पण आता लारा तिच्या कोणत्या आगामी सिनेमामुळे नाही तर, लेकीमुळे चर्चेत आली आहे. सध्या लारा आणि तिच्या मुलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नुकताच, लारा दत्ता हिने लेत सायरा हिच्यासोबत एका व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये लारा आणि लेक सायरा आनंदी दिसत आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लेकीसोबत व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. लाराच्या लेकीचं सौंदर्य पाहून चाहते देखील चकित झाले आहेत. लेकीच्या सौंदर्यापुढे लारा देखील फेल आहे.
View this post on Instagram
सांगायचं झालं तर, लारा दत्ता हिने टेनिस स्टार महेश भूपती यांच्यासोबत लग्न केलं आहे. दोघांना एक मुलगी देखील आहे. लाराची लेक सायरा सध्या शालेय शिक्षण पूर्ण करत आहे. लेकीसोबत व्हिडीओ पोस्ट करत लारा हिने कॅप्शनमध्ये, ‘Getting schooled by my ‘almost 13’ year old on apparently cool transitions!’ असं लिहिलं आहे. सध्या दोघींचा व्हिडीओ तुफान चर्चेत आहे.
लारा दत्ता हिचे सिनेमे
लारा दत्ता हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अंदाज’ सिनेमातून लारा हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमात लारा हिच्यासोबत अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत होती. लाराच्या पहिल्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील तगडी कमाई केली होती.
पहिल्या सिनेमातून यश मिळाल्यानंतर लारा हिने मागे वळून पाहिलं नाही. लारा हिने ‘हाऊसफुल’, ‘पार्टनर’, ‘डॉन 2’, ‘सिंग इज किंग’, ‘नो एन्ट्री’, ‘मस्ती’, ‘बिल्लू बारबर’ यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. लारा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.