माधुरी दीक्षितच्या पतीने दिल्या मायक्रोवेव्हबद्दल खास टीप्स, सुरक्षितपणे कसे तयार करायचे जेवण आणि…

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. माधुरी दीक्षितने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे माधुरी दीक्षितचा चाहतावर्गही अत्यंत मोठा आहे. माधुरी दीक्षित ही काही दिवसांपूर्वीच भारतामध्ये परतली आहे. माधुरी दीक्षितच्या पतीचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय.

माधुरी दीक्षितच्या पतीने दिल्या मायक्रोवेव्हबद्दल खास टीप्स, सुरक्षितपणे कसे तयार करायचे जेवण आणि...
Madhuri Dixit
Follow us
| Updated on: Aug 03, 2024 | 4:51 PM

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित ही कायमच चर्चेत असते. माधुरी दीक्षितची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मुळात म्हणजे माधुरी दीक्षितने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अनेक हीट चित्रपटे माधुरी दीक्षितने बॉलिवूडला दिली आहेत. गेल्या काही वर्षांपासून माधुरी दीक्षित ही विदेशात राहाते. मात्र, आता परत आपल्या पतीसोबत माधुरी दीक्षित ही भारतामध्ये परतलीये. विशेष म्हणजे अनेक शोमध्ये सहभागी होतानाही माधुरी दीक्षित दिसत आहे. माधुरी दीक्षित हिच्या पतीचे नाव श्रीराम नेने असून ते एक डॉक्टर आहेत. श्रीराम नेने हे त्यांच्या व्हिडीओच्या माध्यमातून अनेक महत्वाच्या टीप्स शेअर करताना दिसतात.

आता माधुरी दीक्षितच्या पतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये श्रीराम नेने हे काही महत्वाच्या गोष्टी शेअर करताना देखील दिसत आहेत. श्रीराम नेने यांनी मायक्रोवेव्हमध्ये कशा सुरक्षित पद्धतीने जेवण तयार करायला हवे किंवा गरम करायला हवे हे थेट सांगितले आहे. 

श्रीराम नेने यांच्या मते कधीच मायक्रोवेव्हमध्ये ब्रेड गरम करण्यासाठी ठेऊ नये, असे केल्याने ते रबरसारखे होते. मायक्रोवेव्हसाठी कधीच मेटलची भांडी वापरू नये. मेटलच्या भांड्यांमुळे मायक्रोवेव्हमध्ये स्पार्क होते. हेच नाही तर यामुळे मोठी दुर्घटना देखील होऊ शकत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

हेच नाही तर जेवण गरम करण्यासाठी कधीच प्लास्टिकच्या भाड्याचा वापर करू नये. जर तुम्ही प्लास्टिकच्या भाड्याचा जेवण गरम करण्यासाठी वापर मायक्रोवेव्हमध्ये करत असाल तर आजच सावधान व्हा. कारण प्लास्टिकच्या भांड्यामधील केमिकल थेट अन्नामध्ये उतरते. हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. 

मायक्रोवेव्हमध्ये काचेच्या भांड्यामध्ये अन्न गरम करणे अधिक चांगले असल्याचेही श्रीराम नेने यांनी म्हटले आहे. आता श्रीराम नेने यांचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. माधुरी दीक्षित हिचा काही दिवसांपूर्वीच वाढदिवस झाला. विशेष म्हणजे एका शोमध्ये माधुरी दीक्षित हिला खास सरप्राईज देण्यात आले. यावेळी श्रीराम नेने हे देखील शोमध्ये पोहोचले होते.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.