बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला नाही मिळालं पतीचं प्रेम; वैवाहिक आयुष्यात अनेक अडचणी, २ मिसकॅरेज आणि…
बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी लोकप्रियता तर मिळाली, पण अभिनेत्रीच्या नशीबात नव्हतं पतीचं प्रेम.... २ मिसकॅरेज आणि... आज अशी आयुष्य जगते 'ही' अभिनेत्री...

मुंबई | बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री तर झाली पण अभिनेत्रीचं नातं बॉयफ्रेंड किंवा पतीसोबत फार काळ टिकलं नाही. झगमगत्या विश्वातील अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या आज पैसा, प्रसिद्ध आणि संपत्ती असताना देखील एकटं आयुष्य जगतात. बॉलिवूडची अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री महिमा चौधरी. महिमा चौधरी ही कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. एक काळ होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त महिमा चौधरी हिच्या सौंदर्याची आणि अभिनयाची चर्चा असायची. यशाच्या शिखरावर चढत असताना अभिनेत्रीचा एका प्रसिद्ध खेळाडूवर जीव जडला. पण दोघांचं नातं कधी लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. कारण ज्या खेळाडूवर अभिनेत्रीने अफाट प्रेम केलं, त्याच व्यक्तीने महिमाची फसवणूक केली.
एक काळ असा होता जेव्हा संपूर्ण बॉलिवूडमध्ये आणि चाहत्यांमध्ये अभिनेत्री महिमा चौधरी आणि टेनिस क्रिकेटपटू लिएंडर पेस यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगली होती. दोघांच्या नात्यामध्ये अभिनेता संजय दत्त याची दुसरी पत्नी रिया पिल्लई हिच्यामुळे तडा गेला. महिमा हिला लिएंडर पेस आणि रिया पिल्लई यांच्या नात्याबद्दल कळाल्यानंतर अभिनेत्री नातं संपवलं.. त्यानंतर २००६ मध्ये महिमाने उद्योगपती बॉबी मुखर्जी यांच्यासोबत लग्न केलं.
लग्नानंतर देखील अभिनेत्रीला वैवाहिक आयुष्याचा आनंद घेता आला नाही. महिमा आयुष्यात अनेक असे चढ – उतार आले ज्यामुळे अभिनेत्रीचं पूर्ण करियर उद्ध्वस्त झालं. लग्नानंतर अभिनेत्रीचं दोन वेळा मिसकॅरिज झालं. आयुष्यात का असे संकटं येत आहेत… याचं कारण देखील अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितलं…
२००६ मध्ये लग्न केल्यानंतर अभिनेत्रीने २००७ मध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला. पण बॉबी आणि महिमा यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. अखेर दोघांना २०१३ मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीत खासगी आयुष्याबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘तुम्ही काही तुमच्या आई – वडिलांना सांगत नाही. लोकांना सांगतं तुम्हाला वाटतं छोटी अडचण आहे.. दूर होईल…’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘तुम्ही कोणाला काही सांगत नाही आणि गोष्टी वाढतात. एकदा मी गरोदर राहिली आणि माझं मिसकॅरेज झालं. दुसऱ्यांदा देखील असंच झालं.. कारण मी आनंदी नव्हती..’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.. पण आता महिमा चौधरी तिच्या मुलीसोबत आनंदी आहे. महिमा चौधरी हिचे मुलीसोबत अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. महिमा चौधरी हिच्या मुलीचं नाव आर्याना आहे… आर्याना देखील प्रसिद्ध स्टारकिड्स पैकी एक आहे.. आर्याना देखील तिच्या सौंदर्यामुळे चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते…
महिना चौधरी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर होती. आता आभिनेत्री पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. महिमा अनेक वर्षांनंतर ‘द सिग्नेचर’ आणि ‘इमरजेन्सी’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.