मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं ब्रेकअप? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

मलायका आणि अर्जुनला बऱ्याचदा एकत्र स्पॉट केलं जातं. एकमेकांसोबत फिरायला गेल्यावर ते फोटो शेअर करत असतात. पण सध्या ते एकमेकांसोबत दिसत नाहीत. त्यामुळे त्यांचं ब्रेकअप तर झालं नाही ना, अशी चर्चा सध्या रंगलीये.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं ब्रेकअप? सोशल मीडियावर चर्चांना उधाण
मलायला अरोरा आणि अर्जुन कपूर
Follow us
| Updated on: Jan 13, 2022 | 10:25 AM

अभिनेत्री मलायका अरोरा (malaika arora) आणि अभिनेता अर्जुन कपूर (arjun kapoor) हे बॉलिवूडचं हॉट अॅण्ड बोल्ड कपल सतत कुठल्याना कुठल्या कारणाने चर्चेत असतं. मलायका आणि अर्जुन हे बॉलिवूडमधल्या सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या जोड्यांपैकी एक आहेत. त्यांच्या डेटिंगपासून ते त्यांच्या अफेअरपर्यंत सगळ्याच गोष्टींची चर्चा होते. सध्या मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपची जोरदार चर्चा सिनेवर्तुळात रंगली आहे.

मलायका आणि अर्जुनला बऱ्याचदा एकत्र स्पॉट केलं जातं. एकमेकांसोबत फिरायला गेल्यावर ते फोटो शेअर करत असतात. पण सध्या ते एकमेकांसोबत दिसत नाहीत. त्यामुळे त्यांचं ब्रेकअप तर झालं नाही ना, अशी चर्चा सध्या रंगलीये. आता जर बातमी खरी असेल तर मलायका-अर्जुनच्या चाहत्यांसाठी ही बॅड न्यूजच आहे.

View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खान(arabaz khan) यांनी 19 वर्षांच्या संसारानंतर 2017 ला एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. अरबाजशी काडीमोड घेतल्यानंतर मलायला आणि अर्जुनच्या अफेअरची चर्चा रंगली. या दोघांना सतत एकत्र स्पॉट केलं जाऊ लागलं.

View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

वयातील अंतरामुळे मलायका आणि अर्जुन ट्रोल

मलायका आणि अर्जुन यांच्यात 12 वर्षांचं अंतर आहे. अर्जुन मलायकापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. त्यांच्या वयातील अंतरामुळे नेटकरी त्यांना ट्रोल करताना दिसतात. यावर अर्जुनने काही दिवसांपूर्वी स्पष्टीकरण दिलं होतं. आम्ही दोघंही ट्रोलर्सकडे लक्ष देत नाही. त्या कमेंट आम्ही वाचत देखील नाही, असं त्यानं म्हटलं होतं.

मलायका आणि अर्जुन यांच्या ब्रेकअपची सध्या जोरदार चर्चा आहे. यावर आता मलायला आणि अर्जुन काय स्पष्टीकरण देतात हे पाहणं महत्वाचं आहे.

संबंधित बातम्या

‘त्या गुंड सुकेशपेक्षा तुझा बॉडीगार्ड चांगला दिसतो’, व्हायरल व्हिडीओनंतर नेटकऱ्यांकडून जॅकलिन ट्रोल

स्पृहा जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांची ‘कॉफी’ 14 जानेवारीला प्रदर्शित होणार

छोटी परी, सगळ्यांवर भारी, तिच्या तालावर नाचते दुनिया सारी

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.