किआरा अडवाणीच नाही तर, ‘या’ अभिनेत्रींच्या मंगळसूत्रांची किंमत थक्क करणारी, लाखो नाही कोट्यवधी केले खर्च
'या' सेलिब्रिटींचा विवाहच फक्त शाही अंदाजात झाला नसून; अभिनेत्रींच्या मंगळसूत्रासाठी मोजावी लागले कोट्यवधी रुपये... जाणून घ्या बॉलिवूड अभिनेत्रींच्या मंगळसुत्रांची किंमत...
Bollywood Actress Mangalsutra Design : सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करुन बॉलिवूड कपल लग्नबंधनात अडकले. नुकताच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री किआरा अडवाणी विवाहबंधनात अडकले. सध्या सर्वत्र दोघांच्या लग्नाची आणि लग्नात आलेल्या खर्चाची चर्चा सुरु आहे. सिद्धार्थ – किआरा यांच्यापूर्वी देखील अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या नात्याला नवं नाव दिलं. सेलिब्रिटींनी शाही अंदाजात लग्न केलं. तेव्हा त्यांच्या लग्नाची आणि अभिनेत्रींच्या मंगळसूत्रांची चर्चा तुफान रंगली. कारण काही सेलिब्रिटींनी त्यांच्या मंगळसूत्रासाठी लाख तर काहींनी कोट्यवधी रुपये मोजले आहेत. आज जाणून घेवू अभिनेत्रीच्या मंगळसूत्रांची किंमत…
अभिनेत्री किआरा अडवाणी : अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सिद्धार्थ आणि किआरा यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. किआरा अडवाणी – सिद्धार्थ मल्होत्रा यांनी जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये सप्तपदी घेतल्या. किआरा अडवाणीचं मंगळसूत्र डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाईन केलं आहे. मंगळसूत्राची किंमत २ कोटी रुपये आहे. किआरा हिचा मंगळसूत्र प्रचंड सिंपल आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री आलिया भट्ट : आलिया भट्ट हिने अभिनेता रणबीर कपूर यांच्यासोबत २०२२ मध्ये लग्न केलं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आलिया आणि रणबीर यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. रिपोर्टनुसार आलियाच्या मंगळसूत्राची किंमत ४० ते ५० लाख रुपये आहे.
अभिनेत्री कतरिना कैफ : अभिनेत्री कतरिना कैफ हिने अभिनेता विकी कौशल याच्यासोबत लग्न केल्यानंतर सर्वांना मोठा धक्का बसला. कतरिनाच्या मंगळसूत्राची किंमत ७ लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री दीपिका पादुकोण : अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) कायम तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते. सतत स्टाईलमुळे चर्चेत असणारी दीपिका लग्नानंतर साध्या मंगळसूत्रामुळे चर्चेत होती. रिपोर्टनुसार दीपिकाच्या मंगळसूत्राची किंमत २० लाख रुपये होती.
अभिनेत्री प्रियांका चोप्रा : प्रियांका चोप्रा हिने १० वर्ष लहान गायक निक जोनस याच्यासोबत लग्न केलं. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नात घातलेल्या प्रियांकाच्या मंगळसूत्राची किंमत ५२ लाख रुपये होती.
ऐश्वर्या राय बच्चन : ऐश्वर्या कायम तिच्या सौंदर्याने सर्वांना घायाळ करते. २००७ मध्ये ऐश्वर्याने अभिनेता अभिषेक बच्चन याच्या नावाचा मंगळसूत्र घातला. रिपोर्टनुसार ऐश्वर्याच्या मंगळसूत्राची किंमत ४५ लाख रुपये सांगण्यात आली.