पैशांसाठी सिनेमांमध्ये नको ते काम करणारी अभिनेत्री म्हणते, ‘वाईट कामं केली, कारण…’
Actresss Life : अभिनेत्री प्रेग्नेंट राहिल्यानंतर बॉयफ्रेंडने सोडली साथ, एकटीने केले लेकीचा सांभाळ, आज अभिनेत्री म्हणते, 'सिनेमांमध्ये वाईट कामं केली कारण...', अभिनेत्री तिच्या प्रोफशनल आयुष्यामुळे कमी खासगी आयुष्यामुळे असते अधिक चर्चेत... आता जगतेय सुखी आयुष्य...
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी खासगी आयुष्यात अनेक वाईट प्रसंगांचा समाना केला आहे. अभिनेत्रींना प्रोफेशनल आयुष्यात देखील नकोत्या गोष्टींचा सामना करावा लागला आहे. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे नीना गुप्ता. नीना गुप्ता गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आहेत. नीना गुप्ता कायम त्यांच्या आयुष्यातील धक्कादायक घटना चाहत्यांसोबत शेअर करतात. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत नीना गुप्ता यांनी सिनेमांमध्ये केलेल्या वाईट कामांबद्दल सांगितलं आहे.
नीना गुप्ता म्हणाल्या, ‘गरजेनुसार गोष्टी बदलत जातात. पूर्वी पैशांची अधिक गरज असल्यामुळे वाईट, नको ती कामं केली आहे. अनेकदा तर देवाला प्रार्थना केली आहे, सिनेमा प्रदर्शित होऊ देऊ नको… पण वेळेनुसार सर्वकाही बदलतं. आता मी सिनेमांची निवड आवड म्हणून करते.’
‘एखाद्या सिनेमाची स्क्रिप्ट आवडली नसेल तर, मी स्वतः सिनेमासाठी नकार देखील. पण आधी परिस्थिती वाईट होती. इंडस्ट्रीमध्ये नवीन होती म्हणून नाही देखील बोलू शकत नव्हती. सुरुवातीचे दिवस फार कठीण होते. ‘ असं देखील नीना गुप्ता म्हणाल्या.
‘मी दिल्लीतील असल्यामुळे मुंबई माझ्यासाठी नवीन होती. मुंबईत आल्यानंतर तीन महिन्यात मला पुन्हा घरी जाण्याची इच्छा झाली होती. पण मुंबईत आल्यानंतर कोणाचे पाय दुसरीकडे जात नाहीत. आज निघून गेली आणि चांगलं काम मिळालं तर… याच आशेत मुंबईत राहिली…’
एवढंच नाहीतर, स्वतःच्या मृत्यूबद्दल देखील नीना गुप्ता यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘माझं निधन झाल्यानंतर लोकं लिहितील बोल्ड नीना गुप्ता हिचं निधन… म्हणजे मृत्यूनंतर देखील मला कोणी सोडणार नाही… ठिके… याचा मला काहीही फरत पडत नाही…’ याआधी देखील नीना गुप्ता यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे केले आहेत.
नीना गुप्ता कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. ‘पंचायत’ वेब सीरिज आणि ‘बधाई हो’ यांसारख्या सिनेमामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. वयाच्या 63 व्या वर्षी देखील नीना गुप्ता चाहत्यांचं मनोरंजन करत आहेत.
नीना गुप्ता सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर नीना यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नीना कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.