Neetu Kapoor : ‘ऋषी कपूर इतर महिलांसोबत फ्लर्ट करायचे, पण…’, जेव्हा नीतू यांनी पतीबद्दल सांगितलं मोठं सत्य
लग्नानंतर देखील इतर महिलांसोबत फ्लर्ट करायचे ऋषी कपूर? पतीबद्दल मोठं सत्य सांगताना नीतू कपूर म्हणाल्या, 'अनेकांनी मला त्यांच्या अफेअरबद्दल सांगितलं पण...'

मुंबई | अभिनेते ऋषी कपूर आज जिवंत नसले तरी, त्यांच्याबद्दल चाहत्यांमध्ये अनेक चर्चा रंगलेल्या असतात. ऋषी कपूर यांनी अनेक अभिनेत्रींसोबत एकत्र स्क्रिन शेअर केली एवढंच नाही तर, अनेक अभिनेत्रींसोबत अभिनेत्याचं नाव देखील जोडण्यात आलं. अशात अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केल्यानंतर अभिनेत्री नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांच्यात प्रेमाचं नातं बहरलं. अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण लग्नानंतर देखील ऋषी कपूर इतर महिलांसोबत फ्लर्ट करायचे याचा खुलासा खुद्द नीतू कपूर यांनी एका मुलाखतीतून केला. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. एवढंच नाही तर, पुरुषांना त्यांची स्पेस द्यायला हवी असं देखील नीतू कपूर म्हणाल्या. सध्या सोशल मीडियावर एका पेपरचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी ऋषी कपूर यांच्या अफेअरबद्दल सांगितलं.
नीतू कपूर पतीच्या अफेअरबद्दल म्हणाल्या, ‘ऋषी कपूर यांच्या अफेअरबद्दल मला माहिती होती. अनेक महिलांसोबत फ्लर्ट करताना मी त्यांना पाहिलं आहे. त्याचे अनेक अफेअर होते. पण ते फक्त वन नाईट स्टँड होते… अनेक जण मला त्यांच्या अफेअरबद्दल सांगायचे.. पण ते माझ्या शिवाय राहू शकत नव्हते हे देखील मला माहिती होतं…’
पुढे नितू कपूर म्हणाल्या, ‘पुरुषांना थोडं स्वातंत्र द्यायला हवं. कारण काही गोष्टी त्यांच्या स्वभावात असतात. पण अन्य महिलेसोबत त्यांचं नातं फार पुढे गेलं असतं तर, मी त्यांना घराबाहेर काढलं असते.’ असं देखील नीतू कपूर म्हणाल्या.. सांगायचं झालं तर नीतू कपूर यांनी शेवटपर्यंत पती ऋषी कपूर यांची साथ दिली. ऋषी कपूर यांचं २०२० मध्ये निधन झालं. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली होती..
ऋषी कपूर यांच्या जाण्यांनी नीतू कपूर यांच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली. पतीच्या निधनानंतर नीतू कपूर यांनी पुन्हा बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री केली आहे. आज नीतू कपूर त्यांच्या मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहेत. ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांना दोन मुलं आहे. रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर असं त्यांच्या दोन मुलांची नावे आहे…
रिद्धिमा कपूर झगमगत्या विश्वापासून दूर असते. तिने कधीही बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला नाही. रिद्धिमा एक प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर आहे. रिद्धिमा हिला एक मुलगी देखील आहे. तर ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचा मुलगा रणबीर याने अभिनेत्री आलिया भट्ट हिच्यासोबत लग्न केलं आहे.
आलिया आणि रणबीर यांना एक मुलगी देखील आहे. त्यांच्या मुलीचं नाव राहा कपूर असं आहे. पण अद्याप आलिया आणि रणबीर यांनी लेकीचा चेहरा दाखवलेला नाही. एवढंच नाही तर, नीतू कपूर देखील नातीबद्दल अनेक गोष्टी सांगत असतात. कपूर कुटुंब कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात.