‘या’ बाॅलिवूड अभिनेत्रीच्या घरातून लाखोंची चोरी, थेट ‘या’ व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल
नुकताच एक धक्कादायक घटना घडली आहे. एक बाॅलिवूड अभिनेत्रीच्या घरी मोठी चोरी झालीये. या प्रकरणात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. अभिनेत्रीच्या घरून दागिन्यांची चोरी झालीये. मुंबईच्या घरातून ही चोरी झालीये. याबद्दल अभिनेत्रीकडून देखील मोठ्या खुलासा हा करण्यात आलाय.
मुंबई : नुकताच एक अत्यंत हैराण करणारी बातमी पुढे येतंय. चक्क एका अभिनेत्रीच्या घरी चोरी झाली असून हे प्रकरण थेट पोलिसांमध्ये गेले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. गौरी मॅम अर्थात आपल्या सर्वांची आवडती अभिनेत्री नेहा पेंडसे हिच्या घरी चोरी झालीये. अत्यंत महागडे दागिने चोरीला गेले आहेत. नेहा पेंडसे हिच्या मुंबईतील घरात ही चोरी झालीये. इतकेच नाही तर या प्रकरणात एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. पोलिस आता पुढील तपास करत आहेत.
नेहा पेंडसे हिच्या घरातून तब्बल 6 लाखांचे दागिने हे चोरीला गेले आहेत. नेहा पेंडसे हिचा पती शार्दुल सिंह याने या प्रकरणात ड्रायव्हर विरोधात तक्रार दिलीये. नुकताच याबद्दल नेहा पेंडसे हिला विचारण्यात आले. यावेळी नेहा पेंडसे म्हणाली की, होय हे खरे आहे की, माझ्या घरात चोरी झालीये. मात्र, यावर मला बोलणे योग्य वाटत नाही.
पुढे नेहा पेंडसे ही म्हणाली, मुळात ही गोष्ट लीक झाली कशी हेच मला समजले नाहीये. नेहा पेंडसे हिच्या पतीची हिऱ्याची अंगठी आणि हिऱ्याचे ब्रेसलेट चोरीला गेले आहे. ही घटना 28 डिसेंबर 2023 ची आहे. नेहाचा पती कायमच घरी आल्यावर ही हिऱ्याची अंगठी आणि ब्रेसलेट काढून कपाटामध्ये ठेवण्यासाठी ड्रायव्हरकडे देतो.
तो ड्रायव्हर ते ब्रेसलेट आणि अंगठी कपाटामध्ये ठेवत असत. मात्र, काही दिवसांपूर्वी ते नेहा पेंडसे हिचा पती शार्दुल याला कपाटामध्ये दिसले नाही, त्यानंतर ते शोधण्यात आले. मात्र, मिळाले नसल्याने घरातील सर्व कामगारांची चाैकशी करण्यात आली. मात्र, याबद्दल कोणाकडेच काही माहिती मिळाली नाही.
ज्यावेळी घरातील कामगारांची चाैकशी सुरू होती त्यावेळी तो ड्रायव्हर बाहेर होता. फोन करून त्याला याबद्दल विचारण्यात आले. परंतू त्याने ते दागिने कपाटामध्येच ठेवल्याचे सांगितले. यानंतर नेहा पेंडसे हिच्या पत्नीने पोलिसांमध्ये याबद्दलची तक्रार दाखल केली आहे. आता पोलिस पुढील तपास करत आहेत.