अभिषेक बच्चनला सोडा, 20 वर्ष मोठ्या क्रिकेटरसोबत निम्रत कौरचे ‘प्रेमसंबंध’? लिस्टमध्ये ‘बाहुबली’ फेम अभिनेताही
Nimrat Kaur Love Life: अभिषेक बच्चनच नाही तर, 20 वर्ष मोठ्या क्रिकेटरसोबत देखील होते निम्रत कौरचे प्रेमसंबंध? अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडच्या यादीत 'बाहुबली' फेम अभिनेता देखील सामिल
Nimrat Kaur: बॉलिवूड अभिनत्री निम्रत कौर सध्या तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. शिवाय जगभरात सर्वात जास्त सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये निम्रत अव्वल स्थानी आहे. यामागचं कारण आहे अभिनेता अभिषेक बच्चन. गेल्या काही दिवसांपासून निम्रत कौर हिच्या नावाची चर्चा अभिषेक बच्चन याच्यासोबत सुरु आहे. पण अभिषेक बच्चन याच्या आधी देखील अभिनेत्रीचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं आहे. एवढंच नाही तर ‘बाहुबली’ फेम अभिनेत्याला देखील निम्रत याने डेट केल्या माहिती समोर येत आहे.
निम्रत कौर आणि अभिषेक बच्चन यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, एका रेडिट युजरने दोघांच्या नात्याला दुजोरा दिला होता. यावर खुद्द महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला. यावर अभिषेक – ऐश्वर्या यांच्याकडून कोणतंच अधिकृत वक्तव्य समोर आलं नाही. पण निम्रत हिच्यासोबत रिलेशनशिपच्या चर्चा रंगत असताना, अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला.
अभिषेक सोबत रंगणाऱ्या अफेअरच्या चर्चांवर निम्रतने मात्र मौन सोडलं होतं. ‘मी कोणालाही सध्ये डेट करत नाही.. मी सिंगर आहे…’ अभिनेत्रीने म्हणाली. पण अभिषेक बच्चन याच्यापूर्वी निम्रत हिचं नाव क्रिकेटर आणि ‘बाहुबली’ फेम अभिनेत्यासोबत देखील जोडण्यात आलं.
निम्रत कौर हिच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. अभिनेत्रीचं नाव स्वतःपेक्षा 20 वर्ष मोठ्या क्रिकेटरसोबत देखील जोडण्यात आलं. निम्रत कौर हिचं नाव रवी शास्त्री यांच्यासोबत देखील जोण्यात आलं होतं. 2018 मध्ये दोघांनी गुपचूक लग्न उरकलं… अशा चर्चा देखील रंगल्या. पण दोघांचं नातं फक्त 2 वर्ष टिकलं. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
रंगलेल्या चर्चांनंतर शास्त्री यांनी संताप व्यक्त केला होता. मुलाखतीत रवी शास्त्री म्हणाले होते, ‘अशा बातम्यांमध्ये गायीच्या शेणाशिवाय काहीही नसतं. सर्व वायफळ चर्चा आहे. माझ्यात आणि निम्रतमध्ये असं काहीही नाही…’ असं म्हणत शास्त्री यांनी देखील रंगणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला.
‘बाहुबली’ फेम अभिनेता आणि निम्रत कौर…
‘बाहुबली’ फेम अभिनेता राणा दग्गुबाती याच्यासोबत देखील निम्रत कौर हिचं नाव जोडण्यात आलं होतं. दोघांनी त्यांचं नातं फार प्रायव्हेट ठेवलं होतं. पण राण दग्गुबाती आणि निम्रत कौर यांनी कधीच सर्वांसमोर नात्याचा स्वीकार केला नाही.