परिणीती चोप्रा हिने केला मोठा खुलासा, म्हणाली, राघव चड्ढा याच्यासोबत…

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. परिणीती चोप्रा हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून परिणीती चोप्रा ही तिच्या चित्रपटांमुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

परिणीती चोप्रा हिने केला मोठा खुलासा, म्हणाली, राघव चड्ढा याच्यासोबत...
Parineeti Chopra
Follow us
| Updated on: Aug 08, 2024 | 12:04 PM

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. परिणीती चोप्राची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे परिणीती चोप्रा ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. परिणीती चोप्रा हिने खासदार राघव चड्ढा याच्यासोबत अत्यंत खास पद्धतीने राजस्थानमध्ये लग्न केले. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केले आणि त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांची पहिली भेट ही विदेशात झाली. हेच नाही तर पहिल्याच भेटीमध्ये राघव चड्ढा आणि परिणीती चोपा हे एकमेकांच्या प्रेमात पडले.

परिणीती चोप्रा हिचा काही दिवसांपूर्वीच अमर सिंह चमकीला हा चित्रपट रिलीज झाला. सध्या परिणीती चोप्रा ही कामाच्या शोधात असल्याचे सांगितले जातंय. राघव चड्ढा याच्यावर काही दिवसांपूर्वीच विदेशात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी पतीची काळजी घेण्यासाठी परिणीती चोप्रा ही देखील विदेशात गेली होती.

सध्या परिणीती चोप्रा हिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडीओच्या माध्यमातून परिणीती चोप्रा हिने स्पष्ट केले की, ती लाईव्ह पद्धतीने कशी राघव चड्ढा याच्या संपर्कात असते. आता परिणीती चोप्रा हिचा हाच व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by @parineetichopra

परिणीती चोप्रा ही विदेशात लंडनमध्ये असून राघव चड्ढा हा भारतात आलाय. परिणीती चोप्रा हिने व्हिडीओमध्ये अगोदर स्वत:ला दाखवले आहे आणि समोर असलेल्या स्क्रीनवर ती राघव चड्ढा याला दाखवत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, राघव चड्ढा हा संसदेमध्ये बोलत आहे. याप्रकारे आपण लाईव्ह पद्धतीने राघव चड्ढासोबत कनेक्ट राहत असल्याचे तिने म्हटले आहे.

राघव चड्ढा याला विदेशात परिणीती चोप्रा ही मिस करत असल्याचे या व्हिडीओवरून दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच एक चर्चा तूफान रंगताना दिसली की, परिणीती चोप्रा ही राघव चड्ढा याच्यासोबतच्या लग्नानंतर अभिनय करणार नाहीये. ती कोणत्याही चित्रपटात काम करणार नाहीये. मात्र, तसा खुलासा हा परिणीती चोप्रा हिच्याकडून करण्यात आला नाहीये.

निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार.
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?.
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?.
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.