परिणीती चोप्रा हिने शेअर केला राघव चड्ढा याच्यासोबतचा ‘तो’ खास व्हिडीओ, अभिनेत्रीने पोस्टमध्ये थेट…
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. परिणीती चोप्राची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. परिणीती चोप्रा हिने काही वर्ष डेट केल्यानंतर राघव चड्ढा याच्यासोबत लग्न केले. यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसले.
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी काही दिवसांपूर्वीच लग्न केले. उदयपूरमध्ये यांचा विवाहसोहळा अत्यंत खास पद्धतीने पार पडला. विशेष म्हणजे आता परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांची लव्ह स्टोरी अत्यंत खास आहे. परिणीती आणि राघव यांची पहिली भेट ही लंडनमध्ये झाली आणि पहिल्याच भेटीमध्ये हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. अनेक वर्ष दोघांनी आपले नाते सर्वांपासून लपून ठेवले. परिणीती चोप्रा आणि राघव यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना देखील दिसले.
आता परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे एकसोबत खास वेळ घालवताना दिसत आहेत. नुकताच परिणीती चोप्रा हिने सोशल मीडियावर लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केलीये. आता परिणीती चोप्राची ही पोस्ट व्हायरल होताना दिसतंय.
परिणीती चोप्रा हिने शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दोघे चांगला वेळ एकत्र घालवत आहेत. समुद्रकिनारी दोघे दिसत आहेत. एका व्हिडीओमध्ये दोघे एकमेकांच्या गळ्यात हात घालून उभे दिसत आहेत. फक्त हे फोटो आणि व्हिडीओच नाही तर परिणीती हिने खास पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर केलीये.
View this post on Instagram
परिणीती चोप्राने लिहिले की, आम्ही दोघांनी शांत दिवस घालवला…जिथे फक्त आम्ही दोघेच होतो…आम्हाला लोकांनी पाठवलेले मेसेज आणि फोनसाठी खरोखरच धन्यवाद…पुढे परिणीती चोप्रा म्हणाली की, मला नाही माहिती तू मला मिळाला यासाठी मी या जन्मात आणि मागच्या जन्मात नेमके काय पुण्य केले की..
मी एकदम परफेक्ट व्यक्तीसोबत लग्न केले. आपण अजून लवकर का भेटलो नाही असेही म्हणताना परिणीती चोप्रा ही दिसली. आपण एकच असल्याचे म्हणताना देखील परिणीती चोप्रा ही दिसली. आता परिणीती चोप्रा हिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहेत. लोक परिणीती चोप्रा हिच्या या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.