Parineeti Chopra | परिणीती चोप्रा तूफान ट्रोल, अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी सुनावले खडेबोल
परिणीती चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. परिणीती चोप्रा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. परिणीती चोप्रा हिचे अत्यंत शाही पद्धतीने राजस्थानमधील लीला पॅलेजमध्ये लग्न झाले.
मुंबई : परिणीती चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. परिणीती चोप्रा हिने अनेक वर्षे राघव चड्ढा (Raghav Chadha) याला डेट केल्यानंतर लग्न केले. विशेष म्हणजे राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचा अत्यंत शाही विवाहसोहळा पार पडला. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा याचे लग्न राजस्थान येथील लीला पॅलेजमध्ये पार पडलंय.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील पोहचले. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नातील काही खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. विशेष म्हणजे परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी लग्नात धमाल केल्याचे बघायला मिळाले.
View this post on Instagram
काही दिवस परिणीती चोप्रा ही दिल्लीमध्ये चड्ढा कुटुंबात वेळ घालवताना दिसली. त्यानंतर आता परिणीती चोप्रा ही मुंबईत दाखल झालीये. परिणीती चोप्रा हिचे विमानतळावरील अनेक फोटो हे व्हायरल होताना दिसले. परिणीती चोप्रा ही लग्नानंतर पहिल्यांदाच रॅम्प वॉक करताना दिसली. विशेष म्हणजे यावेळी तिचा जबरदस्त लूक दिसला.
रॅम्प वॉक करताना परिणीती चोप्रा हिने साडी, हातामध्ये बांगड्या आणि सिंदूर लावल्याचे दिसले. परिणीती चोप्रा हिच्या या रॅम्प वॉकचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. मात्र, यामुळे परिणीती चोप्रा ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्याचे बघायला मिळत आहे. लोक तिला खडेबोल सुनावताना दिसत आहेत.
View this post on Instagram
परिणीती चोप्रा हिच्या रॅम्प वॉकच्या फोटो आणि व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, हे फक्त आणि फक्त नाटक आहे. किती दिवस अशाप्रकारे सिंदूर लावून राहणार आहे ही. दुसऱ्याने लिहिले की, बाॅलिवूड कलाकारांकडून दिखावा कसा करायचा हे शिकायला नक्कीच हवे. परिणीती चोप्रा हिच्या या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.