Parineeti Chopra | लग्नानंतर परिणीती चोप्रा हिच्या आयुष्यात ‘हे’ बदल, अभिनेत्रीने दिले मोठे अपडेट
परिणीती चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. परिणीती चोप्रा हिचे लग्न 24 सप्टेंबर रोजी उदयपूरमध्ये पार पडलंय. परिणीती चोप्रा ही सध्या दिल्लीमध्ये आपल्या नव्या कुटुंबासोबत वेळ घालवतंय.
मुंबई : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे लग्न 24 सप्टेंबर रोजी राजस्थानच्या उदयपूर येथील लीला पॅलेजमध्ये पार पडलंय. परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाला अत्यंत खास लोक उपस्थित होते. अत्यंत शाही पद्धतीने परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे लग्न पार पडले. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नातील अनेक फोटो (Photo) आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे या लग्नाला पोहचले होते.
थेट लग्नाच्या एक दिवस अगोदर परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे विविध खेळ आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत खेळताना दिसले. मोठी धमाल यांनी नक्कीच केलीये. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नात कोट्यवधी रूपये खर्च करण्यात आल्याने अनेकांनी राघव चड्ढा याच्यावर आरोप देखील केले.
परिणीती चोप्रा ही आता लग्नानंतर दिल्ली येथे चड्ढा कुटुंबासोबत धमाल करताना दिसतंय. लग्नानंतर परिणीती चोप्रा हिचे चड्ढा परिवारात जबरदस्त असे स्वागत केले. याचाही व्हिडीओ व्हायरल झाला. परिणीती चोप्रा ही पुढील काही दिवस दिल्लीमध्येच आपल्या नव्या कुटुंबासोबत खास वेळ घालवताना दिसणार आहे.
आता नुकताच परिणीती चोप्रा हिने एक अत्यंत खास फोटो शेअर केलाय. या फोटोच्या माध्यमातून दिल्लीमध्ये चड्ढा परिवारासोबत कशाप्रकारे ती वेळ घालवत आहे हे दिसतंय. परिणीती चोप्रा हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती वृत्तपत्रातील सुडोकू सोडवताना दिसतंय. यासोबत एक चहाचा कप देखील तिथे दिसतोय.
मिशन रानीगंज हा परिणीती चोप्रा हिचा चित्रपट नुकताच रिलीज झालाय. मिशन रानीगंज चित्रपटात परिणीती चोप्रा हिच्यासोबत अक्षय कुमार हा मुख्य भूमिकेत आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रेक्षकांना आवडल्याचे दिसतंय. या चित्रपटाटे काही खास प्रमोशन करताना परिणीती चोप्रा ही दिसली नाही. आता आगामी चित्रपटासाठी परिणीती चोप्रा ही मुंबईत दाखल होणार असल्याचे सांगितले जातंय.