Preity Zinta | ‘त्या’ घटनेमुळे उद्ध्वस्त झालं होतं प्रितीचं आयुष्य; एक महत्त्वाचा निर्णय आणि अभिनेत्री मालामाल

आई वडिलांनी सोडली साथ,'त्या' धक्कादायक घटनेनंतर यशाच्या शिखरावर असलेल्या प्रितीचं आयुष्य झालं उद्ध्वस्त... आज अभिनेत्री कोट्यवधींचा मालकीण

Preity Zinta | 'त्या' घटनेमुळे उद्ध्वस्त झालं होतं प्रितीचं आयुष्य; एक महत्त्वाचा निर्णय आणि अभिनेत्री मालामाल
Follow us
| Updated on: Jun 11, 2023 | 3:42 PM

मुंबई : अभिनेत्री प्रिती झिंटा (Preity Zinta) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, प्रिती कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये स्वतःची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या प्रितीने आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला आहे. ४८ वर्षीय प्रितीने २५ वर्षांपूर्वी अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘दिल से’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. ‘दिल से’ सिनेमानंतर प्रितीने ‘सोल्जर’, ‘क्या कहना’, ‘कल हो ना हो’, ‘सलाम नमस्ते’, ‘वीर जारा’, ‘संघर्ष’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात घर केलं. अभिनेत्रीच्या सिनेमांना देखील प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.

प्रोफेशल आयुष्यात प्रिती उंच भरारी घेत होती. पण अभिनेत्रीच्या खासगी आयु्ष्यात मात्र अनेक चढ – उतार येत होते. आपल्या हसण्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या प्रिती झिंटाने वयाच्या १३व्या वर्षी वडिलांना  गमावलं. अभिनेत्रीचे वडील दुर्गानंद झिंटा याचं कार अपघातात निधन झालं. याच अपघातात अभिनेत्रीची आई नीलप्रभा देखील गंभीर जखमी झाल्या होत्या.

दुर्दैवी अपघातानंतर अभिनेत्रीची आई दोन वर्षे अंथरुणाला खिळून राहिल्या. अपघाताच्या दोन वर्षांनंतर आणि प्रिती १५ वर्षांची झाल्यानंतर अभिनेत्रीच्या आईने देखील जागाचा निरोप घेतला. आईच्या निधनानंतर प्रिती पूर्णपणे एकटी पडली. मात्र, जेव्हा प्रितीने काही करायचं ठरवलं तेव्हा तिने ते नक्कीच केलं आणि बॉलिवूडच्या अभिनेत्रींच्या यादीत प्रिती आली.

हे सुद्धा वाचा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉलिवूडमध्ये उंच भरारी घेत असताना अभिनेत्रीचं आयुष्य उध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर होतं. जेव्हा प्रितीने बॉलीवूड निर्माता भरत शाह आणि अंडरवर्ल्डमधील इतर लोकांविरोधात वक्तव्य केलं. तेव्हा सर्वत्र खळबळ माजली होती. अखेर कालांतराने अंडरवर्ल्डनेही हळूहळू फिल्म इंडस्ट्रीकडे पाठ फिरवायला सुरुवात केली, पण त्यानंतर प्रितीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं..

आज अभिनेत्री झगमगत्या विश्वापासून दूर असली तरी, कोट्यवधी रुपये कमावते. मीडिया रिपोर्टनुसार, प्रिती झिंटा हिचं नेट वर्थ तब्बल १५ मिलियन डॉलर म्हणजे 110 कोटी रुपये आहे. सध्या अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्याचा आनंद घेत आहे. प्रितीने सेरोगेसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांना जन्म दिला आहे.

अभिनेत्री कायम सोशल मीडियावर मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. 2016 मध्ये प्रितीने परदेशी बॉयफ्रेंड जेन गुडनाइफशी लग्न केलं. आता अभिनेत्री व्यतिरिक्त प्रीती एक यशस्वी बिझनेसवुमन देखील आहे. याशिवाय तिने ऋषिकेशच्या अनाथाश्रमातील 34 मुलींनाही दत्तक घेतलं आहे.

Non Stop LIVE Update
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ.