प्रियांका चोप्रा हिने पती निक जोनस याच्यासोबतचे ‘ते’ फोटो केले शेअर, मुलगी मालतीही…
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. प्रियांका चोप्राची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच दिसते.
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. प्रियांका चोप्राची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. प्रियांका चोप्रा ही सोशल मीडियावर सक्रिय आहे. बॉलिवूडनंतर प्रियांकाने आपला मोर्चा हा थेट हॉलिवूडकडे वळवला आहे. काही दिवसांपूर्वीच अनंत अंबानी याच्या लग्नासाठी प्रियांका चोप्रा ही पोहोचली होती. विशेष म्हणजे यावेळी प्रियांका चोप्रा हिच्यासोबत निक जोनस हा देखील होता. यावेळी अनंत अंबानी याच्या लग्नात धमाल करताना प्रियांका चोप्रा दिसली. प्रियांका चोप्रा ही आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच दिसते.
काही दिवसांपूर्वीच प्रियांकाचा पती निक जोनस याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये थेट कॅमेऱ्यासमोरच लिपलॉक करताना प्रियांका आणि निक हे दिसले. प्रियांका चोप्रा हिच्या चित्रपटाच्या सेटवर निक जोनस आणि मुलगी मालती मेरी हे पोहोचले होते. मालती प्रियांकाच्या सेटवर धमाल करताना दिसली.
आता प्रियांका चोप्रा हिने नुकताच निक जोनस याच्यासोबतचे अत्यंत खास असे फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले. यासोबतच तिने खास कॅप्शन शेअर करत निक जोनस याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. प्रियांकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये निक जोनस आणि मालती दिसत आहेत. आता प्रियांकाच्या या पोस्टवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.
प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी दोन वर्ष एकमेकांना डेट करून लग्न केले. विशेष म्हणजे यांचे लग्न अत्यंत खास पद्धतीने पार पडले. प्रियांका चोप्रा ही निक जोनस याच्यासोबत लग्न झाल्यापासून विदेशात आहे. मात्र, असे असतानाही प्रियांका आपल्या भारतातील चाहत्यांच्या संपर्कात कायमच असते. प्रियांका चोप्रा ही निक जोनस याच्या नेहमीच शोला देखील पोहोचते.
प्रियांका चोप्रा ही जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबासोबत घालवताना दिसते. मुलगी मालती मेरी हिचा एक फोटो प्रियांकाने शेअर केला होता. त्या फोटोमध्ये मालती ही आपल्या छोट्या हाताने चक्क चपाती लाटताना देखील दिसली. मुलगी मालती मेरीचे कायमच प्रियांका ही फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.