प्रियांका चोप्राचा पती ‘नॅशनल जीजू’, निक म्हणाला, ‘मी जीजू म्हणजे भारताचा मोठा…’
Priyanka Chopra husband Nick Jonas : 'मोठ्या बहिणीचा नवरा म्हणजे जीजू, या नात्याने मी भारताचा मोठा...', 'नॅशनल जीजू' या शब्दावर निक जोनस याचं मोठं वक्तव्य..., सध्या सर्वत्र निक जोनस आणि प्रियांका चोप्रा यांच्या नात्याची चर्चा...
बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने हॉलिवूड सिंगर निक जोनस याच्यासोबत लग्न केलं. अनेक वर्ष अनेकमेकांना डेट केल्यानंतर प्रियांका आणि निक यांनी लग्न करण्यचा निर्णय घेतला. प्रियांका हिच्यासोबत लग्न केल्यामुळे निक याला ‘नॅशनल जीजू’ म्हणून ओळख मिळाली. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत निक याने ‘नॅशनल जीजू’ या ओळखीवर मोठं वक्तव्य देखील केलं. सध्या सर्वत्र फक्त निक याने जीजू या शब्दावर केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत निक याला, ‘तुला जीजू असं का म्हटलं जातं आणि यावर तुझ्या काय भावना आहेत?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर निक म्हणाला, ‘सर्वांना माहिती आहे माझं लग्न प्रियांका चोप्रा हिच्यासोबत झालं आहे. आमच्या लग्नानंतर मला प्रत्येकाने मला जीजू असं म्हणायला सुरुवात केली आणि मी नॅशनल जीजू झालो…’
View this post on Instagram
जीजू शब्दाचा अर्थ सांगत निक म्हणाला, ‘जीजू शब्दाचा अर्थ आहे मोठ्या बहिणीचा पती… याच नात्याने मी भारताचा मोठा भाऊ आहे…’ असं देखील निक म्हणाला. सांगायचं झालं तर, अनेक शोमध्ये देखील निक याचा उल्लेख ‘नॅशनल जीजू’ म्हणून केला जातो… अमेरिकेतील एका टॉक शोमध्ये निक याने जीजू शब्दाचा अर्थ सांगत ‘मी भारताचा मोठा भाऊ आहे…’ असं म्हणाला…
निक जोनक आणि प्रियांका चोप्रा
निक जोनक आणि प्रियांका चोप्रा यांचं 2018 मध्ये लग्न झाले. निक आणि प्रियांका यांनी जेधपूर याठिकाणी मोठ्या शाही थाटात लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. निक आणि प्रियांका यांनी ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीत लग्न. लग्नानंतर प्रियांका पतीसोबत परदेशात स्थायिक झाली.
निक याच्यासोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्रीने सेरोगसीच्या मदतीने लेक मालती हिचं जगात स्वागत केलं. प्रियांका कायम लेकीसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोशल मीडियावर प्रियांका हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.