प्रियांका चोप्रा हिची मुलगी प्रिती झिंटाच्या मुलांसोबत दिसली धमाल करताना, ‘ते’ खास फोटो व्हायरल, अभिनेत्री…

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे प्रियांका चोप्रा हिने आता बॉलिवूड चित्रपटांनंतर आपला मोर्चा हा हॉलिवूड चित्रपटांकडे वळवला आहे. प्रियांका चोप्रा ही मोठ्या संपत्तीची मालकीनही आहे. प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते.

प्रियांका चोप्रा हिची मुलगी प्रिती झिंटाच्या मुलांसोबत दिसली धमाल करताना, 'ते' खास फोटो व्हायरल, अभिनेत्री...
Priyanka Chopra
Follow us
| Updated on: Aug 19, 2024 | 3:54 PM

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. विशेष म्हणजे प्रियांका चोप्रा ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना प्रियांका चोप्रा दिसते. काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा हिच्या चित्रपटाच्या सेटवर निक जोनस आणि त्याची मुलगी मालती मेरी हे पोहोचले होते. यावेळीचे काही खास फोटोही प्रियांका चोप्रा हिने सोशल मीडियावर शेअर केले. कायमच आपल्या कामामधून वेळ काढून कुटुंबियांसोबत खास वेळ घालवताना प्रियांका चोप्रा ही दिसते.

निक जोनस याच्यासोबत लग्न झाल्यापासून प्रियांका चोप्रा ही विदेशात राहते. मात्र, असे असतानाही प्रियांका चोप्रा ही आपल्या चाहत्यांच्या कायमच संपर्कात असते. आता मुलगी मालती मेरीसोबत खास वेळ घालवताना प्रियांका ही दिसत आहे. आता या विकेंडला मालती मेरी हिने अभिनेत्री प्रीती झिंटाच्या हिच्या मुलांसोबत धमाल केलीये. 

प्रियांका चोप्रा ही निक जोनस याच्यासोबत मुलगी मालतीला घेऊन डिस्नेलँडला गेली. प्रियांका चोप्रा हिने इंस्टाग्रामवर स्टोरीवर मालती मेरी आणि प्रीती झिंटाच्या मुलांसोबतचे खास फोटो शेअर केला आहेत. या फोटोमध्ये मालती मेरी ही खेळण्यात मग्न दिसत आहे. विशेष म्हणजे प्रियांका चोप्रा हिने विकेंड फन म्हणत प्रिती झिंटा हिला देखील टॅग केले आहे. 

View this post on Instagram

A post shared by Patty Cardona (@jerryxmimi)

एका फोटोमध्ये मालती ही खेळताना दिसत आहे आणि निक जोनस हा देखील मालती आणि इतर मुलांसोबत खेळण्यात बिझी दिसत आहे. मुलीसोबत धमाल करताना प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे देखील दिसत आहेत. प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे जास्तीत जास्त वेळ मुलगी मालती मेरी हिच्यासोबत घालवताना दिसतात.

काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा हिने काही खास फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये मालती मेरी आपल्या छोट्या हातांनी चक्क पोळी लाटताना दिसली. हेच नाही तर प्रियांकाने हे देखील म्हटले होते की, मी आज माझी आवडती भाजी भेंडी खात आहे. निक जोनस याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तो प्रियांका चोप्रा हिची किस घेताना देखील दिसला.

खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.