रत्ना पाठक यांनी नसीरुद्दीन शाह यांच्यासोबतच्या लग्नाबद्दल केला मोठा खुलासा, एका मुलीचा बाप आणि…
रत्ना पाठक यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये जाने तू या जाने ना, गोलमाल 3 अशा चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. रत्ना पाठक यांनी मंडी चित्रपटापासून आपल्या करिअरची सुरूवात केलीये. आपल्या खासगी आयुष्यामुळेही रत्ना पाठक या चर्चेत राहिल्या आहेत.
रत्ना पाठक यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. रत्ना पाठक यांनी नक्कीच मोठा काळ गाजवलाय. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये रत्ना पाठक यांनी काम मिळत नसल्याचे म्हटले होते. हेच नाही तर यावेळी आपल्याला काम का मिळत नाहीये हे देखील सांगताना रत्ना पाठक या दिसल्या. एका वर्षापासून आपण कामाच्या शोधात असल्याचे रत्ना पाठक यांनी म्हटले होते. आमच्याकडे सोशल मीडियावरील फॅन फाॅलोइंग पाहून काम दिले जाते, असे थेट रत्ना पाठक यांनी म्हटले होते.
आता नुकताच रत्ना पाठक यांनी एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना रत्ना पाठक या दिसल्या आहेत. हेच नाही तर रत्ना पाठक यांनी पहिल्यांदाच त्यांच्या लग्नाबद्दल भाष्य केले आहे. रत्ना पाठक म्हणाल्या की, ज्यावेळी मी नसीरुद्दीन शाह याच्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगितले, त्यावेळी माझे घरचे नाराज झाले.
हेच नाही तर आमच्या लग्नाच्या विरोधात होते. माझ्या लग्नाबद्दल ऐकून माझे आई आणि बाबा नाराज झाले आणि ते काळजीत पडले. आपल्या कुटुंबात हे काय होत आहे हेच त्यांना कळत नव्हते. मुळात म्हणजे माझे कुटुंबिय नाराज होण्याचे कारण नसीरुद्दीन शाह हे मुस्लिम आहेत किंवा ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, हे नव्हते.
माझे कुटुंबिय नाराज होण्याचे कारण म्हणजे नसीरुद्दीन शाह हे विवाहित होते आणि एका मुलीचे वडील आहेत होते. नसीर एक अभिनेता आहे आणि त्याचा लूकही फार चांगला नव्हता हे देखील आवडले नव्हते. पुढे आयुष्यात काय होणार याची चिंता माझ्या पालकांना सतावत होती. कुटुंबाचा उदहनिर्वाह कसा होणार याचा ते विचार करत होते.
अखेर थोड्या दिवसांनी त्यांनी मला लग्नासाठी होकार दिला. रत्ना पाठक आणि नसीरुद्दीन शाह यांचे लग्न 1982 मध्ये झाले. विशेष म्हणजे रत्ना पाठक आणि नसीरुद्दीन शाह हे दोघेही एकमेकांसोबत अत्यंत चांगले आयुष्य जगत आहेत. या दोघांची दोन मुले देखील आहेत. रत्ना पाठक यांनी त्यांच्या करिअरची सुरूवात ही ‘मंडी’ या चित्रपटापासून केलीये.