Rekha यांचा खळबळजनक खुलासा, ‘आई होण्याची इच्छा कधी नव्हतीच कारण…’

Rekha | पतीसाठी सर्वकाही करायला तयार होत्या रेखा, पण पतीने सात महिन्यात संपवलं स्वतःचं आयुष्य, स्वतःच्या मुलांबाबत रेखा याचं मोठं वक्तव्य... वयाच्या ६९ व्या वर्षी देखील रेखा राहतात एकट्याच.. त्यांना आई का व्हायचं नव्हतं... सध्या सर्वत्र रेखा यांच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Rekha यांचा खळबळजनक खुलासा, 'आई होण्याची इच्छा कधी नव्हतीच कारण...'
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 12:28 PM

मुंबई | 14 ऑक्टोबर 2023 : बॉलीवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा (Rekha) आज बॉलीवूड मध्ये सक्रिय नसल्या तरी चाहत्यांमध्ये त्यांची चर्चा कायम रंगलेली असते. रेखा त्यांच्या खाजगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. ‘सिलसिला’, ‘खून भरी मांग’, ‘उमराव जान’, ‘कोई मिल गया’, ‘क्रिश’, ‘खिलाडियो का खिलाडी’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ”दिल है तुम्हारा’, ‘सुपर नानी’, ‘बीवी हो तो ऐसी’. ‘नागिन’, ‘मिस्टर नटवरलाल’ अशा अनेक सिनेमांमध्ये रेखा यांनी महत्त्वाची भूमिका साकारत चहात्यांचा मनोरंजन केलं. बॉलीवूडमध्ये यशाच्या शिखरावर असताना रेखा यांना चहात्यांनी डोक्यावर उचलून घेतलं. बॉलिवूडमध्ये रेखा यांनी अनेक अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर देखील केली.

रेखा यांना प्रोफेशनल आयुष्यामध्ये यश तर मिळालं पण त्यांच्या खाजगी आयुष्यामध्ये अनेक संकटं आली. रेखा यांनी अनेक चढ-उतारांचा सामना केला आहे. आज वयाच्या ६९ व्या वर्षी रेखा एकट्याच आयुष्य जगत आहेत. रेखा यांच्या आयुष्यात प्रेमाचे एन्ट्री झाली नाही असं काहीनाही, बॉलीवूडमध्ये काम करत असताना रेखा यांचं अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत नाव जोडण्यात आलं. पण कोणासोबतही नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही.

अखेर १९९० मध्ये रेखा यांनी उद्योजक मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केलं. पण त्यांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही. मुकेश यांनी लग्नाच्या सात महिन्यानंतर स्वतःला संपवलं त्यानंतर रेखा यांच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाचे एन्ट्री कधी झालीच नाही. पतीच्या निधनानंतर रेखा यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.

एका मुलाखतीमध्ये रेखा यांनी त्यांच्या जोडीदाराबद्दल एक इच्छा व्यक्त केली होती. त्या म्हणाल्या होत्या, ‘मी लग्नासाठी नकार देत नाहीये, पण मला माझ्या इच्छा पूर्ण करणारा जोडीदार हवा आहे. जो मला माझा स्वतःचा वेळ देईल. मी देखील पूर्णपणे त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी तयार आहे. मी त्याच्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवेल, मी त्याची काळजी घेईल, त्याचे कपडे धुवेल, मी हे सर्व काही मोठ्या आनंदाने करेल. पण त्याने देखील माझ्या भावनांचा विचार करायला हवा..’

एवढंच नाही तर आई होण्याच्या इच्छेवर देखील रेखा यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. ‘रेखा म्हणाल्या होत्या मला आई व्हायचं नाहीये आणि याबद्दल माझी काही खंत  नाहीये. जर मला एखादा असा व्यक्ती भेटला ज्याला माझ्याकडून मुलांची अपेक्षा नाहीये मी अशा व्यक्तीसोबत लग्न करेल. कारण मूल झाल्यानंतर मी माझ्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करू शकत नाही. माझं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल.’ सध्या सर्वत्र रेखा यांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

रेखा यांच्या खाजगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांचं नाव विनोद मेहरा, किरण कुमार, जितेंद्र या सर्वांसोबत जोडण्यात आलं. पण महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांच्या प्रेमाचे किस्से आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. रेखा यांच्या बद्दल महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॉलीवूड मध्ये त्या आज सक्रिय नसल्या तरी अनेक ठिकाणी किंवा कार्यक्रमांमध्ये त्यांना स्पॉट केलं जातं. वयाच्या 69 व्या वर्षी देखील रेखा यांचा सौंदर्य कमी झालेला नाही. आजही रेखा चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.