Rekha | ‘पिता म्हणून त्यांनी केलं तरी काय?’, वडिलांकडून रेखा यांना नाही मिळाला लेकीचा दर्जा; आईसोबत देखील…

Rekha | रेखा यांचा कुटुंब म्हणून वडिलांनी कधीच नाही केला स्वीकार, अभिनेत्रीच्या आईसोबत देखील होती अशी वागणूक... अत्यंत खडतर होतं रेखा यांचं बालपण... सध्या सर्वत्र रेखा यांच्या खासगी आयुष्याची चर्चा.. काय होतं रेखा यांच्या वडिलांचं नाव..

Rekha | 'पिता म्हणून त्यांनी केलं तरी काय?', वडिलांकडून रेखा यांना नाही मिळाला लेकीचा दर्जा; आईसोबत देखील...
Follow us
| Updated on: Oct 10, 2023 | 11:56 AM

मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : वडिलांचं प्रेम हे एका मुलीसाठी जगातील सर्वात मोठी गोष्ट असते. वडील आणि लेकी नातं देखील फार वेगळं आहे. सांगायचं झालं तर, बॉलिवूमध्ये अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांना वडिलांची साथ मिळाली. म्हणून अभिनेत्रींनी अनेक संकटांवर मात केली. पण अभिनेत्री रेखा यांना वडिलांचं प्रेम कधी मिळालंच नाही. रेखा यांना प्रोफेशलन आयुष्यात भरभरुन यश मिळालं. पण रेखा यांचं खासगी आयुष्य प्रचंड खडतर होतं. ‘मिस्टर नटवरलाल’, ‘नागिन’, ‘लज्जा’, ‘सिलसिला’, यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री रेखा यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण रेखा यांना आई – वडिलांचं कधी एकत्र प्रेम मिळालं नाही.

रेखा यांच्या वडिलांचा नाव जेमिनी गणेशन होतं. ते तामिळ सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटी होते. तर रेखा यांची पुष्पावल्ली एक प्रसिद्ध तेलुगू अभिनेत्री होत्या. रेखा यांचं बालपण फार खडतर होतं. जेमिनी गणेशन यांनी कधीच रेखा यांचा स्वीकार मुलगी म्हणून केला नाही. शिवाय रेखा यांच्या आई पुष्पावल्ली यांच्यासोबत कधी लग्न देखील केलं नाही.

जेमिनी गणेशन यांनी त्यांच्या आयुष्यात कधीच रेखा आणि त्यांच्या आईचा कुटुंब म्हणून स्वीकार केला नाही. अशात वडिलांच्या निधनानंतर देखील रेखा यांनी दुःख व्यक्त केलं नव्हतं. २००५ मध्ये रेखा यांच्या वडिलांचं निधन झालं. दरम्यान वडिलांसोबत असलेल्या नात्यावर रेखा यांनी मुलाखतीत मोठं वक्तव्य केलं होतं

हे सुद्धा वाचा

वडिलांबद्दल रेखा म्हणाल्या, ‘त्यांच्या निधनानंतर मी दुःख का व्यक्त करु. त्यांच्या आयुष्यात माझ्यासाठी कोणतंच स्थान नव्हतं. वडील म्हणून माझ्या आयुष्यात त्यांचं काहीही योगदान नाही. त्यांच्यासोबत मी एकही क्षण घालवला नाही यासाठी मला आनंद आहे. ते फक्त माझ्या कल्पनांमध्ये सामील होते… वडील म्हणून त्यांनी काहीही केलं नाही…’ सध्या सर्वत्र रेखा यांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

रेखा यांच्या रिलेशनशिपबद्दल सांगायचं झालं तर, महानायक अमिताभ बच्चन यांच्या शिवाय रेखा यांचं नाव राज बब्बर, मिथुन चक्रवर्ती, विनोद मेहरा, अक्षय कुमार यांच्यासोबत जोडण्यात आलं. पण कोणासोबतही अभिनेत्रीचं नात लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. रेखा आज सर्वकाही असून एकटं आयुष्य जगतात.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.