मुंबई : झगमगच्या विश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी वाढत्या वयात लग्न केलं. अशाच अभिनेत्यांपैकी एक म्हणजे जेमिनी गणेशन (Gemini Ganesan). १९५० ते १९८० मध्ये तामिळ इंडस्ट्रीत जेमिनी गणेशन यांचा सर्वत्र बोलबाला होता. जेमिनी त्यांच्या काळातील हॅडसम अभिनेत्यापैकी एक होते. त्यांच्या लूक्सच्या चर्चा चाहत्यांमध्ये कायम रंगलेल्या असायच्या. जेमिनी त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असायचे. जेमिनी यांनी त्या काळात ३ वेळा लग्न केलं असून त्यांना आठ मुलं होती. त्यांच्या एका मुलीचं नाव होतं रेखा (Rekha). पण जेमिनी यांनी कधीही अभिनेत्री रेखा यांना मुलीचा दर्जा दिला नाही. वडिलांची ही गोष्ट रेखा यांना बिलकूल आवडत नव्हती.
जेमिनी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी सुरुवातीला सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारत अभिनेय क्षेत्रात पदार्पण केलं. जेमिनी यांना डॉक्टर म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायची होती. म्हणून त्यांनी पहिलं लग्न केलं आणि सासऱ्यांनी जेमिनी यांना मेडिकल कॉलेजमुळे प्रवेश करून दिला. त्यानंतर जेमिनी यांनी दुसरं लग्न श्रीमंत अभिनेत्री सावित्री यांच्यासोबत लग्न केलं. ज्यामुळे जेमिनी तुफान चर्चेत आले होते.
दुसऱ्या लग्नानंतर जेमिनी यांनी तिसरं लग्न वयाच्या ७८ व्या वर्षी केलं. स्वतःपेक्षा ३६ वर्ष लहान महिलेसोबत लग्न केल्यामुळे जेमिनी तुफान चर्चेत आले. यशाच्या शिखरावर चढत असताना जेमिनी अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले. तीन लग्न केल्यानंतर जेव्हा जेमिनी यांचं नाव अभिनेत्री पुष्पावलीसोबत जोडण्यात आलं, तेव्हा देखील जेमिनी वादाच्या भोवऱ्यात अडकले.
झगमगत्या विश्वात पाय ठेवल्यानंतर जेमिनी यांनी पुष्पावली यांच्यासोबत मिस मालिनी आणि चंद्रधारी यांसारख्या सिनेमामध्ये काम केलं. सिनेमात एकत्र काम करत असताना पुष्पावली आणि जेमिनी यांच्यामध्ये प्रेम बहरलं. पण दोघांनी कधीही लग्न केलं नाही. जेमिनी यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना पुष्पावली विवाहित होत्या.
पुष्पावली पहिल्या पतीपासून विभक्त झाल्या होत्या. पण त्यांचं घटस्फोट झालं नव्हतं. कारण 1956 पर्यंत भारतात घटस्फोटाला मान्यता नव्हती. अशात पुष्पावली आणि जेमिनी यांच्या नात्याला अनेकांनी विरोध केला. जेमिनी यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना पुष्पावली यांनी १० ऑक्टोबर १९५४ मध्ये मुलगी रेखा यांना जन्म दिला.
जेमिनी आणि पुष्पावली यांनी लग्न न करता एका मुलीला जन्म दिल्याच्या चर्चांनी सर्वत्र जोर धरला. त्यामुळे जेमिनी यांनी कधीही रेखा यांना मुलीचा दर्जा दिला नाही. त्यानंतर पुष्पावलील यांनी १९५५ साली जेमिनी यांची दुसरी मुलगी राधी हिला जन्म दिला. पण जेमिनी यांनी कायम रेखा आणि राधा यांच्यावर दुर्लक्ष केलं.
22 मार्च 2005 रोजी अनेक अवयव निकामी झाल्यामुळे जेमिनी यांचं निधन झालं. मिळालेल्या माहितीनुसार, जेमिनी यांनी रेखाला कधीही आपल्या मुलीचा दर्जा दिला नाही, त्यामुळेच वडिलांच्या निधनाची बातमी मिळाल्यानंतरही रेखा त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहिल्या नाहीत.