फक्त अमिताभ बच्चन नाही, तर अभिनेत्री रेखा यांचं या ७ जणाशी अफेअर गाजलं
तुम्हाला फक्त अमिताभ बच्चन आणि रेखा यांचं अफेअर माहित असेल, पण रेखासोबत या ७ जणांची अफेअर खूपच गाजली... सध्या सर्वत्र रेखा यांच्या खासगी आयुष्याची चर्चा...
मुंबई | 29 जुलै 2023 : अभिनेत्री रेखा यांचं नाव फक्त महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबतच नाही तर, आणखी सात सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. रेखा यांनी एकासोबत लग्न पण केलं. पण लग्नाच्या काही महिन्यांनंतर रेखा यांच्या पतीने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. अमिताभ बच्चन यांच्यासोबत रेखा यांच्या नावाची तुफान चर्चा रंगली. पण विनोद मेहरा यांच्यासोबत असलेलं रेखा यांचे प्रेमसंबंध देखील चर्चेचा विषय ठरले. रेखा आणि विनोद मेहरा यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. अनेक वर्ष दोघांनी एकमेकांना डेट देखील केलं. चाहत्यांमध्ये देखील रेखा आणि विनोद मेहरा यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगली.
पण विनोद मेहरा यांच्या आईला लेकाचं रेखा यांच्यासोबत असलेलं नातं मान्य नव्हतं. जेव्हा आई आणि रेखा या दोघींमध्ये एकीला निवडण्याची वेळ आली तेव्हा विनोद मेहरा यांनी मात्र आईची निवड केली. ज्यामुळे रेखा पुन्हा एकट्या पडल्या. अशा परिस्थितीत रेखा आणि विनोद मेहरा यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही.
रेखा यांच्या अफेअर्स लिस्टमध्ये अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी होते. पण जेव्हा अभिनेता अक्षय कुमार याच्यासोबत रेखा यांच्या नावाची चर्चा रंगू लागली, तेव्हा मात्र सर्वांना धक्का बसला. पण दोघांनी कधीच नात्यावर स्पष्ट भूमिका मांडली नाही. रेखा – अक्षय यांनी त्यांच्या नात्याचा स्वीकार देखील केला नाही आणि नत्याला नकार देखील दिला नाही.
प्रेमात सतत अपयश मिळत असलेल्या रेखा यांनी १९९० मध्ये उद्योजक मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केलं. पण रेखा वैवाहिक आयुष्यात आनंदी नव्हत्या. लग्नाच्या काही महिन्यातच मुकेश अग्रवाल यांनी स्वतःला संपवलं. शिवाय शेवटच्या पत्रात माझ्या निधनाला कोणीही जबाबदार नाही.. असं देखील लिहिलं होतं. पण त्यांच्या मृत्यूचं रहस्य आजही रहस्यच आहे.
अनेकांसोबत रेखा यांच्या नावाची चर्चा रंगली पण, अभिनेते आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत रेखा यांच्या नात्याची चर्चा आजही रंगलेली असते. ‘सिलसिला’ सिनेमानंतर रेखा – अमिताभ यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगली. दोघांच्या नात्याबद्दल आजही तुफान चर्चा रंगलेल्या असतात.
अमिताभ बच्चन, विनोद मेहरा, अक्षय कुमार, मुकेश अग्रवाल यांच्यासोबतच आणखी ३ सेलिब्रिटींसोबत रेखा यांच्या अफेअरची तुफान चर्चा रंगली. विश्वजीत, साजिद खान आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत देखील रेखा यांच्या नात्याची तुफार चर्चा रंगली. पण आज सर्व काही असूनही रेखा एकट्याच आयुष्य जगत आहेत.