रेखा आणि अमिताभ यांचा रोमांटिक सीन पाहून जया बच्चन ढसाढसा रडल्या, ‘त्या’ सिनेमाच्या कटू आठवणी..
अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन हे त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहतात. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.
अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन आणि रेखा यांनी अनेक हिट चित्रपट बाॅलिवूडला दिली आहेत. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर सक्रिय दिसतात. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओही शेअर करताना अमिताभ बच्चन दिसतात. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना यांचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला प्रेक्षकांच्या चांगलाच प्रतिसाद देखील मिळाला.
1978 मध्ये अमिताभ बच्चन आणि रेखा यांचा ‘मुकद्दर का सिंकदर’ चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात रेखा आणि अमिताभ बच्चन हे मुख्य भूमिकेत धमाका करताना दिसले. हेच नाही तर मुकद्दर का सिंकदर चित्रपटात रेखा आणि अमिताभ बच्चन यांचे काही रोमांटिक सीन्स देखील होते. याबद्दल एका मुलाखतीमध्ये रेखाने मोठा खुलासा केला.
रेखाने मुलाखतीमध्ये म्हटले की, ज्यावेळी जया बच्चन या माझे आणि अमिताभ बच्चन यांचे चित्रपटातील रोमांटिक सीन सुरू होते, त्यावेळी त्या रडत होत्या. एकदा संपूर्ण बच्चन कुटुंब मुकद्दर का सिंकदर चित्रपट पाहण्यासाठी प्रोजेक्शन रूमममध्ये पोहचले होते. जेंव्हा मुकद्दर का सिंकदर सुरू झाला, त्यावेळी जया बच्चन या सर्वात पुढच्या रांगेत बसल्या होत्या.
अमिताभ बच्चन हे त्यांच्या आई वडिलांसोबत मागच्या रांगेत बसले होते. त्यावेळी मला फार स्पष्टपणे नाही पण जया बच्चन यांचा चेहरा दिसत होता. मिस्टर बच्चनचे रोमांटिक सीन चित्रपटात सुरू असताना जया बच्चन या रडत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर अश्रू स्पष्टपणे दिसत होते. ज्यावेळी मुकद्दर का सिंकदर चित्रपट आला होता, त्यावेळी अभिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचे लग्न झाले होते.
1973 मध्ये जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांचे लग्न झाले. 1981 मध्ये सिलसिला या चित्रपटात परत एकदा अमिताभ बच्चन आणि रेखा यांनी काम केले. मुकद्दर का सिंकदर चित्रपट रिलीज झाल्यानंतर अशी एक चर्चा होती की, अमिताभ बच्चन हे रेखासोबत परत कधीच काम करणार नाहीत, तसे त्यांनी निर्मात्यांना सांगितले देखील. मात्र, त्यानंतर परत ते सिलसिलामध्ये एकत्र काम करताना दिसले.