‘टायगर 3’ प्रदर्शित होण्यापूर्वी बक्कळ तिकिटांची विक्री, ॲडव्हान्स बुकिंगने रचला विक्रम

Salman Khan : सलमान खान स्टारर 'टायगर 3' सिनेमाच्या ॲडव्हान्स बुकिंगने रचला विक्रम, 5 लाखांपेक्षा अधिक तिकिटांची विक्री, कमाईचा आकडा थक्क करणारा..., 12 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला आहे.

'टायगर 3' प्रदर्शित होण्यापूर्वी बक्कळ तिकिटांची विक्री, ॲडव्हान्स बुकिंगने रचला विक्रम
Follow us
| Updated on: Nov 11, 2023 | 10:56 AM

मुंबई | 11 नोव्हेंबर 2023 : अभिनेता सलमान खान स्टारर ‘टायगर 3’ सिनेमा 12 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमात भाईजान मुख्य भूमिकेत दिसणार असून अभिनेत्री कतरिना कैफ झोया या भूमिकेला न्याय देताना दिसणार आहे. एवढंच नाही तर, अभिनेता इमरान हश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘टायगर 3 ‘ सिनेमाची चर्चा सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे रविवार सुट्टीचा दिवस आणि सलमान खान याचा सिनेमा प्रदर्शित होणार म्हटल्यानंतर चित्रपटगृहात प्रेक्षकांची गर्दी होणार यात काही शंका नाही.

सलमान खान स्टारर ‘टायगर 3’ सिनेमा प्रदर्शित होणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. एवढंच नाही तर सिनेमाच्या तिकिटांची दमदार ॲडव्हान्स बुकिंग देखील झाली आहे. ‘टायगर 3’ सिनेमाच्या ॲडव्हान्स बुकिंगची सुरुवात 4 नोव्हेंबर रोजी झाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘टायगर 3’ सिनेमाची चर्चा सुरु आहे.

‘टायगर 3’ सिनेमाची ॲडव्हान्स बुकिंग

मिळालेल्या माहितीनुसार, 10 नोव्हेंबर रात्री 8 वाजेपर्यंत ‘टायगर 3’ सिनेमाचे 5 लाख 34 हजार 722 तिकिट विक्री झाले आहे. म्हणजे प्रदर्शनापूर्वीच ‘टायगर 3’ सिनेमाने जवळपास 14.24 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी अद्याप एक दिवस बाकी आहे. म्हणून ‘टायगर 3’ सिनेमा किती कोटी रुपयांचा गल्ला पार करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘टागयर 3’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. त्यामुळे सिनेमा किती कोटी रुपयांचा गल्ला जमा करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सिनेमा विश्लेषक सुमित काडेल यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार ‘टायगर 3’ सिनेमा प्रदर्शनानंतर आठ दिवसांत 300 ते 360 कोटी रुपयांपर्यंत कमाई करु शकेल.

सोशल मीडियावर देखील सध्या ‘टायगर 3’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. सलमान, कतरिना सिनेमाबद्दल अनेक गोष्टी सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. सलमान खान स्टारर ‘टायगर’ सिनेमाच्या दोन्ही भागांना चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. पण आता ‘टायगर 3’ सिनेमाला प्रेक्षकांकडून किती प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सलमान खान याच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत कायम चाहते असतात. सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. फक्त भारतात नाही तर, जगभरात अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. म्हणून ‘टायगर 3’ सिनेमा किती कोटी रुपयांचा गल्ला जमा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.