Bollywood | अल्पवयीन मुलीसोबत असं कृत्य; बॉयफ्रेंडसोबत तुरुंगात गेलेली ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री

Bollywood | बॉलिवूड अभिनेत्रीने बॉयफ्रेंडच्या मदतीने केली फसवणूक, अल्पवयीन मुलीसोबत केलं असं कृत्य! तुरुंगाची खावी लागली हवा... कोण आहे 'ती'?... सध्या बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा... एकेकाळी होती बॉलिवूडची सर्वात हॉट अभिनेत्री...

Bollywood | अल्पवयीन मुलीसोबत असं कृत्य; बॉयफ्रेंडसोबत तुरुंगात गेलेली 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री
Follow us
| Updated on: Oct 06, 2023 | 7:34 PM

मुंबई | 6 ऑक्टोबर 2023 : झगमगत्या विश्वातील ग्लॅमर, प्रसिद्धी, लोकप्रियता, पैसा…इत्यदी गोष्टी चाहत्यांना आकर्षित करतात. पण सेलिब्रिटींच्या आयुष्यात घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीची माहिती चाहत्यांना नसते. पण सध्या कधीतरी समोर येतंच… असंच काही झालं आहे अभिनेत्री सना खान हिच्यासोबत. आज सना पती अनस सैय्यद याच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. नुकताच अभिनेत्री मुलाला दिला. अभिनेत्री कायम मुलाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आज अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे, पण एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्रीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगाची हवा खायला लागली होती. आज अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, अभिनेत्री तिच्या भूतकाळात घडलेल्या गोष्टींमुळे चर्चेत असते. सध्या सर्वत्र सना खान हिची चर्चा आहे.

सना खान हिने २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ये है हाय सोयायटी’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर देखील अभिनेत्रीने एक ऍडल्ट सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अभिनेत्रीने अनेक भाषांमधील सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. शिवाय अभिनेत्री ‘बिग बॉस ६’ सिनेमाच्या माध्यमातून देखील चाहत्यांच्या भेटीस आली.

सना खान हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध नाव आहे. पण अभिनेत्री अनेकदा वादग्रस्त परिस्थितीत अडकली. २०१३ मध्ये सना खानवर एका अल्पवयीन मुलीचं अपहरण केल्याचा आरोप होता. रिपोर्टनुसार, पीडित मुलीने सना हिच्या भावासोबत काम करण्यास नकार दिला होता. त्यानंतर अभिनेत्रीने मुलीचे अपहरण करण्यात आल्याचं अनेकदा सांगण्यात आलं.

हे सुद्धा वाचा

एवढंच नाही तर, आणखी एका कारणामुळे अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. सना खान हिने एक्स बॉयफ्रेंड इस्माईल खान याच्यासह मीडिया कन्सल्टंटला धमकावल्याचा आणि विनयभंग केल्याचाही आरोप होता, त्यामुळे तिला अटक करण्यात आली होती. आज सना तिच्या खासगी आयु्ष्यात आनंदी असली तरी, काही वर्षांपूर्वी अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली होती.

सना खान हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने अनस सैय्यद याच्यासोबत लग्न केल्यानंतर झगमगत्या विश्वाला राम – राम ठोकला. आता अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.