Sara Ali Khan | ‘… तेव्हा मला कळलं माझी आई काय आहे’, अमृता सिंग बद्दल साराचं मोठं वक्तव्य
Sara Ali Khan | वडिलांची सुटलेली साथ, इतर मुलांच्या आई-वडिलांपाहून साराला काय वायायचं? सारा अखेर म्हणालीच, '... तेव्हा मला कळलं माझी आई काय आहे', सारा कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यावर वक्तव्य करत असते. आता देखील सारा हिने आई - वडिलांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा अली खान हिच्या कुटुंबाची चर्चा रंगली आहे.
अभिनेत्री सारा अली खान कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सारा अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृती सिंग यांची मुलगी असल्यामुळे तिच्या खासगी गोष्टी चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. सारा देखील तिच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सारा हिने तिच्या आईबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. एवढंच नाहीतर, सारा हिने आईने दिलेल्या संस्कारांबद्दल देखील मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा हिची चर्चा रंगली आहे.
सारा म्हणाली, ‘माझ्या इतर मित्रांसोबत जेव्हा मी मोठी होत होती, तेव्हा मला कळलं माझ्या आयुष्यात कोणतीतरी कमतरता आहे. पण लवकरच कळलं जे काही आहे, ते कोणत्या आशीर्वादापेक्षा कमी नाही. मी जेव्हा मोठी होती तेव्हा मी अनुभवलं माझी आई, माझ्या मित्रांच्या आईपेक्षा फार वेगळी आहे.’
पुढे सारा म्हणाली, ‘माझ्या आईला उत्तम स्वयंपाक करता येत नाही. तिला नव्हतं माहिती ड्राईव्ह कसं करतात. माझ्या आईला या सर्व गोष्टी माहिती नाहीत याचं मला वाईट वाटायचं. तेव्हा माझ्या आईने मला समजालं आणि सांगितलं तुझ्या किती मित्रांनाच्या पालकांना अभिनय करता येतो. घोडेस्वारी करता येते… तेव्हा मला कळलं माझी आहे काय आहे…’
‘आईने मला आणि इब्राहिम याला कधी कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली नाही. तिने एकटीने आमचा सांभाळ केला आहे. माझी आई माझी प्रेरणा आहे.’ असं देखील सारा म्हणाली. सारा कायम तिच्या आई – वडिलांबद्दल बोलताना दिसते. सांगायचं झालं तर, सैफ अली खान याच्या दुसऱ्या कुटुंबासोबत देखील सारा आणि इब्राहिम यांचे चांगले संबंध आहेत.
सैफ अली खान – करीना कपूर खान यांच्या घरी देखील सारा आणि इब्राहिम यांचं येणं – जाणं असतं… एवढंच नाहीतर, सैफच्या चारही मुलांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. करीना देखील सारा आणि इब्राहिम यांच्याबद्दल चाहत्यांना सांगत असते.
सारा सध्या ‘ए वतन मेरे वतन’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. सारा हिने ‘केदारनाथ’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आज सारा बॉलिवूडच्या लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्रीच्या यादीत अव्वल स्थानी आहे.