सारा अली खान हिचा विमानामध्ये संताप, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, रागामध्ये…
सारा अली खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव साराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सारा अली खानचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. आता सध्या सोशल मीडियावर सारा अली खान हिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय.
सारा अली खान हिने बॉलिवूडच्या अनेक हीट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. सारा अली खान ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही सारा अली खान दिसते. सारा अली खान हिचे चित्रपट गेल्या काही दिवसांपासून धमाका करताना दिसत आहेत. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सारा अली खान दिसते. सारा अली खान हिचा काही दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसला. या व्हिडीओमध्ये सारा मुंबईच्या रस्त्यांवर रिक्षाने फिरताना दिसली. हा व्हिडीओ पाहून लोकही हैराण झाले.
सारा अली खान ही अनंत अंबानी याच्या लग्नात धमाल करताना दिसली. अत्यंत खास लूकमध्ये ती लग्नात दाखल झाली. सध्या सोशल मीडियावर सारा अली खानचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये सारा चांगलीच भडकल्याचे बघायला मिळतंय. सारा अली खान ही रागात रागात निघून जाताना दिसत आहे.
व्हायरल होणारा हा व्हिडीओ विमानामधील असून चुकून सारा अली खान हिच्या अत्यंत महागड्या ड्रेसवर एअरहोस्टेसकडून ज्यूस सांडते. यानंतर सारा अली खान हिचा पारा चांगलाच चढतो. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, सारा अली खान ही रागात आहे. हेच नाहीतर तर ती एअरहोस्टेसकडे रागात बघते.
View this post on Instagram
त्यानंतर ती तिथून उठून जाताना देखील दिसत आहे. आता सारा अली खान हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतोय. अनेकांनी म्हटले की, इतके काय जास्त झाले? ज्यूस तरच सांडला आहे, साफ करून घे. दुसऱ्याने म्हटले की, कधी कधी या इतक्या छोट्या गोष्टी होतात सारा इतके रागावण्यासारखे यामध्ये नेमके काय आहे.
मुळात म्हणजे व्हायरल होणारा हा व्हिडीओ कमर्शियल जाहिरातीसाठी शूट करण्यात आलाय. सारा अली खान तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. सारा अली खान ही शिखर पहाडिया याच्या भावाला डेट करत असल्याचे सांगितले जातंय. विशेष म्हणजे यांचे फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.