‘पुन्हा तपासून पाहा…’, दुसऱ्या मुलाच्या जन्मनंतर असं का म्हणाली अभिनेत्री?

दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर पूर्णपणे गोंधळली होती 'ही' अभिनेत्री? 'पुन्हा तपासून पाहा...' डॉक्टरांना असं का म्हणाली अभिनेत्री? तिने डॉक्टरांना पुन्हा तपासून पाहाण्यास तर सांगितलंच पण..., नुकताच एक महत्त्वाच्या विषयावर वक्तव्य करत अभिनेत्रीने सांगितला अनुभव...

'पुन्हा तपासून पाहा...', दुसऱ्या मुलाच्या जन्मनंतर असं का म्हणाली अभिनेत्री?
Follow us
| Updated on: Oct 18, 2023 | 1:03 PM

मुंबई | 18 ऑक्टोबर 2023 : दुसऱ्या मुलच्या जन्मानंतर डॉक्टरांना पुन्हा तपासून पाहाण्यास सांगणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून अभिनेत्री शेफाली शहा आहे. शेफाली कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री एका मोठ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. एका महत्त्वाच्या मुद्द्यावर वक्तव्य करत अभिनेत्री दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर घडलेल्या घटनेबद्दल सांगितलं आहे. शेफाली नुकताच महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘कोन बनेगा करोडपती 15’ मध्ये उपस्थित राहीली होती. KBC मध्ये शेफाली हिने अनेक गोष्टींचा खुलासा केला.

KBC मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत बोलताना अभिनेत्रीने दुसरा मुलगा मौर्या याच्या जन्माबद्दल सांगितलं. शेफाली म्हणाली, ‘मला वाटलं की दुसऱ्यांदा मला मुलगी होईल..जेव्हा एका बाळाचा जन्म होतो. तेव्हा तो क्षण आई आणि कुटुंबासाठी आनंदाचा असतो. विशेषतः जेव्हा मुलीचा जन्म होतो..’

हे सुद्धा वाचा

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जेव्हा मौर्य याचा जन्म झाला तेव्हा डॉक्टरांना पुन्हा तपासून पाहा.. असं मी सांगितलं. कारण मला वाटलं मुलगी झाली असेल.. अनेक लोकं आहेत ज्यांनी मुलगी हवी हवी असते. पण सध्याचं दुर्भाग्य म्हणजे मुलींनी मंदिरात किंवा दुसऱ्या ठिकाणी सोडून दिलं जातं.’ सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

‘कोन बनेगा करोडपती 15’ मध्ये अभिनेत्री राम पांडे नावाच्या एक व्यक्तीसोबत पोहोचली होती. राम पांडे यांच्याबद्दल सांगायचं झालं म्हणजे, ते अत्यंत मोलाचं काम करतात. झारखंड याठिकाणी देओघर येथील नारायण सेवा आश्रमाची जबाबदारी राम पांडे यांनी स्वीकारली आहे.

राम पांडे आश्रमात ३५ मुलींचा सांभाळ करतात. ज्यांनी कुटुंबियांनी सोडून दिलं आहे, आशा मुलींचा सांभार राम पांडे करतात. नारायण सेवा आश्रमा शिवाय अनेक ठिकाणी आश्रम आहे, ज्याठिकाणी आनाथ मुलांचा साभांळ केला जातो.

शेफाली शाह हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने अनेक सिनेमे आणि वेब सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. शिवाय अभिनेत्री तिच्या वक्तव्यांमुळे देखील कायम चर्चेत असते.

शेफाली शाह सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. अभिनेत्रीने अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील फोटो पोस्ट केला आहे.

sleep apnea साठी कराडला ICU मध्ये ठेवायची काय गरज - जितेंद्र आव्हाड
sleep apnea साठी कराडला ICU मध्ये ठेवायची काय गरज - जितेंद्र आव्हाड.
अक्षय प्रकरणात मला धस यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही- जितेंद्र आव्हा
अक्षय प्रकरणात मला धस यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही- जितेंद्र आव्हा.
शिंदे आभार कोणाचे मानणार ? EVM चे का ? संजय राऊत यांचा टोला
शिंदे आभार कोणाचे मानणार ? EVM चे का ? संजय राऊत यांचा टोला.
जरांगेंनी फडणवीस यांना बोल लावले, पण भाजपाला..., काय म्हणाले आंबेडकर
जरांगेंनी फडणवीस यांना बोल लावले, पण भाजपाला..., काय म्हणाले आंबेडकर.
'वाल्मीक कराडची जप्त संपत्ती फार लांब...,' काय म्हणाले सुरेश धस
'वाल्मीक कराडची जप्त संपत्ती फार लांब...,' काय म्हणाले सुरेश धस.
भगवे कपडे अन् रूद्राक्ष माळ्या... किन्नर आखाड्यात अभिनेत्री संन्यासी
भगवे कपडे अन् रूद्राक्ष माळ्या... किन्नर आखाड्यात अभिनेत्री संन्यासी.
मुंबईत हवालदाराच्या लेकानं वडिलांच्या बंदुकीतून झाडल्या स्वत:वर गोळ्या
मुंबईत हवालदाराच्या लेकानं वडिलांच्या बंदुकीतून झाडल्या स्वत:वर गोळ्या.
धसांनी घेतली कॉवत यांची भेट अन् त्या हत्याप्रकरणासंदर्भात केली मागणी
धसांनी घेतली कॉवत यांची भेट अन् त्या हत्याप्रकरणासंदर्भात केली मागणी.
'लालपरी'सह रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, ‘इतके’ रुपये मोजावे लागणार
'लालपरी'सह रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, ‘इतके’ रुपये मोजावे लागणार.
'ते म्हणाले तुला मारणार...', कराडचा उल्लेख अन् गित्तेकडून गंभीर आरोप
'ते म्हणाले तुला मारणार...', कराडचा उल्लेख अन् गित्तेकडून गंभीर आरोप.