Shilpa Shetty | शिल्पा शेट्टी हिचा धक्कादायक खुलासा, बाॅलिवूडला दाखवला आरसा, थेट म्हणाली कधीच
शिल्पा शेट्टी हिच्याकडे फिटनेस क्वीन म्हणून बघितले जाते. शिल्पा शेट्टी कायमच आपल्या चाहत्यांसाठी व्यायामाचे फोटो शेअर करताना दिसते. शिल्पा शेट्टी ही सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याच्यावर अत्यंत गंभीर आरोप काही दिवसांपूर्वी करण्यात आले.

मुंबई : बाॅलिवूडची फिटनेस क्वीन अर्थात शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिने आपल्या करिअरची सुरूवात बाजीगर चित्रपटाने केली. विशेष म्हणजे अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करताना शिल्पा शेट्टी ही दिसली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून शिल्पा शेट्टी दूर आहे. असे असतानाही शिल्पा शेट्टी कायमच चर्चेत असते. विशेष म्हणजे शिल्पा शेट्टी ही सोशल मीडियावरही सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास व्हिडीओ (Video) आणि फोटो शेअर करताना शिल्पा शेट्टी दिसते. आपल्या फिटनेसकडे शिल्पा फार जास्त लक्ष देते.
शिल्पा शेट्टी ही कायमच सोशल मीडियावर व्यायामाचे आणि तिच्या डाएटचे व्हिडीओ शेअर करते. शिल्पा शेट्टी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच शिल्पा शेट्टी हिची बहीण शमिता शेट्टी ही बिग बाॅसच्या घरात सहभागी झाली. शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शमिताला सपोर्ट करताना दिसली.
नुकताच आता शिल्पा शेट्टी हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये शिल्पा शेट्टी ही आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना दिसतंय. शिल्पा शेट्टी हिला बाॅलिवूडमध्ये आता तीस वर्षे पूर्ण झाली आहेत. इतक्या वर्षांनंतर आपल्या मनातील खदखद शिल्पा शेट्टी हिने व्यक्त केलीये. अनेकांना शिल्पा शेट्टी हिचे बोलणे ऐकून धक्का देखील बसलाय.
शिल्पा शेट्टी ही म्हणाली की, माझी कोणीच बाॅलिवूडच्या टाॅप 10 अभिनेत्रीमध्ये गणना केली नाही. नाराजी तरी कोणासमोर मांडणार? मी नेहमीच ज्या गोष्टी पुढे आहेत. त्यावर काम करण्याचा प्रयत्न करते. आता तर काही विषयच नाहीये. मी कायमच आलेले चित्रपट आणि वेब सीरिजवर काम करते.
शिल्पा शेट्टी हिने टाॅप 10 अभिनेत्रीमध्ये कोणी मला घेतले नसल्याचे म्हणत आपली एकप्रकारे नाराजीच जाहीर केलीये. शिल्पा शेट्टी हिचे हे बोलणे ऐकून तिचे चाहतेही हैराण झाले आहेत. कारण शिल्पा शेट्टी हिने तिच्या करिअरमध्ये धमाकेदार अभिनय केलाय. विशेष म्हणजे शिल्पा शेट्टी हिचे अनेक चित्रपटही हिट ठरले आहेत.
शिल्पा शेट्टी हिला यावेळी राज कुंद्रावर चित्रपट येणार की नाही? यावर देखील विचारण्यात आले. शिल्पा शेट्टी म्हणाली की, त्याबद्दल इथे बोलणे नक्कीच योग्य नाही. पुढे शिल्पा शेट्टी म्हणाली, माझे दोन्ही मुले शाळेत जातात. माझे दिवसभर शेड्यूल बिझी असते. शिल्पा शेट्टी यावेळी तिच्या फिटनेसबद्दल बोलताना देखील दिसली आहे.