सोनाक्षी सिन्हा – झहीर इक्बाल यांच्यात किती आहे वयाचं अंतर, किती मोठी आहे अभिनेत्री?
Sonakshi Sinha Marriage | सोनाक्षी सिन्हा - झहीर इक्बाल यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा, दोघांमध्ये किती आहे वयाचं अंतर? सिन्हा कुटुंबियांना नाही मान्य लग्न... अभिनेत्रीच्या भावाने केलेल्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण, 'माझं काहीही घेणं देणं नाही...' असं का म्हणाला लव सिन्हा...
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. 19 जूनपासून दोघांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात होणार असल्याची माहिती मिळत आहे. तर 23 जून रोजी लग्न आहे. दोघांच्या लग्नाची पत्रिका देखील सोशल मीडियावर लीक झाली आहे. शिवाय, ‘अफवा खऱ्या आहेत…’ असं देखील पत्रिकेवर लिहिलं आहे. दोघांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या 7 वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत. गेल्या एक वर्षापासून दोघे लिव्हइन-रिलेशनशिपमध्ये राहात आहेत… असं देखील सांगितलं जात आहे.
सोनाक्षी आणि झहीर यांच्या नात्याबद्दल सर्वत्र तुफान चर्चा रंगली आहे. शिवाय दोघांच्या वयात असलेल्या अंतराची देखील चर्चा रंगली आहे. सोनाक्षी सिन्हा हिचा जन्म 2 जून 1987 मध्ये झाला आहे. अभिनेत्री आता 37 वर्षांची आहे. झहीर याचा जन्म 10 डिसेंबर 1988 मध्ये झाला. अभिनेता आता 35 वर्षांचा आहे. म्हणजे सोनाक्षी झहीर याच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे.
सोनाक्षी – झहीर यांच्या ओळखीबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता सलमान खान याच्या पार्टीमध्ये दोघांची पहिली ओळख झाली. त्यानंतर ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सोनाक्षी – झहीर यांनी एकत्र स्क्रिन देखील शेअर केली आहे. ‘डबल एक्सएल’ सिनेमात दोघंनी एकत्र काम केलं आहे.
सोनाक्षी – झहीर यांच्या लग्नाला कुटुंबियांचा विरोध?
सोनाक्षी – झहीर यांच्या लग्नावर अभिनेत्रीचा भाऊ लव सिन्हा आणि वडील शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रीचा भाऊ म्हणाला, ‘‘मी सध्या मुंबईत नाही. माझं यासंबंधी काहीही घेणं-देणं नाही. यावर प्रतिक्रिया देण्याचा किंवा कोणत्याही प्रकारे अडकण्याचा माझा कोणताही हेतू नाही. मला रंगणाऱ्या चर्चांपासून दूर राहायचं आहे… असं अभिनेत्रीचा भाऊ म्हणाला. ज्यामुळे चाहत्यांना देखील धक्का बसला आहे.
काय आहे वडील शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया ?
शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ‘सोनाक्षीवर माझा विश्वास आहे. ती जो निर्णय घेईल तो योग्य असेल. मी तिच्या लग्नात भन्नाट डान्स करले…’ पण पुढे ते म्हणाले, ‘आताची मुलं आई-वडिलांना काहीही सांगत नाही. त्यांची परवानगी घेत नाहीत फक्त निर्णय घेतात. मला देखील प्रतिक्षा आहे, की सोनाक्षी मला लग्नाबद्दल कधी सांगेल.’ सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.