ऐन लग्नातच सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्यात वाद, अखेर लग्नानंतर अभिनेत्रीने ते…
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी सात वर्षे डेट करून लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. सोनाक्षी सिन्हा हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. सोशल मीडियावरही सोनाक्षी सक्रिय असते.
सोनाक्षी सिन्हा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सोनाक्षी सिन्हाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सोनाक्षी सिन्हा हिने 23 जून 2024 रोजी झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाला तिच्या घरच्यांचा विरोध असल्याचे सांगितले जात होते. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी एकमेकांना सात वर्षे डेट करून लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोनाक्षी आणि झहीर यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. विशेष म्हणजे लग्नात सोनाक्षी धमाल करताना दिसली.
गेल्या काही दिवसांपासून सोनाक्षी सिन्हा ही प्रेग्नंट असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. आता नुकताच सोनाक्षी सिन्हा हिने लग्नानंतर आयुष्यात नेमके काय बदल झाले हे सांगितले आहे. सोनाक्षी सिन्हा म्हणाली की, माझ्या लग्नाच्या पाच दिवसांच्या अगोदरच माझ्या बेस्ट फ्रेंडला बेबी झाला, त्यामुळे ती लग्नात येऊ शकली नाही. मग मी आणि झहीर बेस्ट फ्रेंडला भेटण्यासाठी आणि बेबीला पाहण्यासाठी सिंगापुरला गेलो.
सोनाक्षी सिन्हा हिला विचारण्यात आले की, लग्नानंतर तिच्या आयुष्यात नेमके काय बदल झाले? यावर बोलताना सोनाक्षी सिन्हा म्हणाली की, माझ्या आयुष्यात काहीच बदल झाले नाहीत. आता फक्त हेच बदलले आहे की, मी माझ्या बेस्ट फ्रेंडसोबत राहत आहे, हीच मजेदार गोष्ट आहे. बाकी सर्व पूर्वीसारखेच आहे. एक सुंदर नाते हेच असते, ज्यामध्ये काहीच आपल्याला बदलावे लागत नाही.
आयुष्य खूप जास्त चांगले सुरू आहे. झहीर हा एक खूप चांगला व्यक्ती आहे. मी खरोखरच लकी आहे. सोनाक्षीने पुढे म्हटले की, माझे आणि झहीरचे सर्व मित्र एकच आहेत. लग्नात माझ्यामध्ये आणि झहीरमध्ये तू तू मैं मैं सकीब सलीममुळे झाली. त्याचे कारण म्हणजे तो लग्नात नेमका कोणाकडून आहे मुलाकडून की मुलीकडून.
लग्नात आमचे मित्र एक दिवस मुलीकडून होते तर दुसऱ्या दिवशी मुलाकडून. आम्ही सर्वजण खूप जास्त आनंदी आहोत. आमचे लग्न खास झाले. सोनाक्षी सिन्हा ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच सोनाक्षी सिन्हा दिसते. झहीर इक्बाल याच्यासोबत लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा आनंदी असल्याचे बघायला मिळतंय.