लग्नानंतर ट्रोलिंगला घाबरून सोनाक्षी सिन्हा हिने केले ‘हे’ मोठे काम, झहीर इक्बाल…
सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे नुकताच सोनाक्षी सिन्हा हिने झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. काही वर्षांपासून सोनाक्षी सिन्हा आणि झहीर एकमेकांना डेट करत होते.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. नुकताच सोनाक्षी सिन्हा हिने अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे यांनी सिव्हल मॅरेज केले आहे. मुस्लिम किंवा हिंदू कोणत्याही पद्धतीने यांनी लग्न केले नाहीये. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल एकमेकांना सात वर्षापासून डेट करत होते. सुरूवातीला चर्चा होती की, सोनाक्षी सिन्हा आणि झहीरच्या लग्नामुळे सिन्हा कुटुंबिय नाराज आहे. मात्र. सोनाक्षी सिन्हाने शेअर केलेल्या फोटोमध्ये सोनाक्षीने वडिलांच्या हात पकडून सही केल्याचे बघायला मिळतंय.
हेच नाही तर लग्नाच्या अगोदरच्या सर्व विधी देखील करताना शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा दिसले. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी लग्नाच्या पार्टीला हजेरी लावली. या पार्टीमध्ये सोनाक्षी सिन्हा ही जबरदस्त लूकमध्ये दिसली. सर्वांनाच सोनाक्षी सिन्हाचा लूक आवडला. हेच नाही तर सोनाक्षी सिन्हाने पापाराझीसोबत फोटो देखील काढली आहेत.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी आपल्या लग्नानंतर खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले. मात्र, ट्रोलिंगपासून वाचण्यासाठी दोघांनीही कमेंट सेक्शन ऑफ केले आहे. लग्नाच्या फोटोनंतर लोक ट्रोलिंग करणार याचा अंदाजा असल्याने त्यांनी थेट कमेंट सेक्शन ऑफ केले. अनेकांना सोनाक्षी सिन्हाचा लूक आवडलाय.
View this post on Instagram
झहीर इक्बाल याच्यासोबत सोनाक्षी लग्न करणार असल्याचे कळाल्यापासूनच तिला लोक खडेबोल सुनावताना दिसले. सुरूवातीपासूनच चर्चा होती की, सोनाक्षीच्या या निर्णयाला सिन्हा कुटुंबिय विरोध करत आहेत. विशेष: सोनाक्षी सिन्हाची आई पूनम सिन्हा सोनाक्षीच्या निर्णयामुळे नाराज आहे.
सोनाक्षी सिन्हाने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. सोनाक्षी सिन्हाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मोठ्या संपत्तीची मालकीनही सोनाक्षी सिन्हा आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावरही सोनाक्षी सिन्हा सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.