या राजकारण्यांवर…., सोनू सूद याचं लक्षवेधी वक्तव्य
actor sonu sood | भारतातील राजकारण्यांबद्दल असं का म्हणाला अभिनेता सोनू सूद? जनतेला आवाहन करत अभिनेता म्हणाला, 'विश्वास ठेवणं म्हणजे...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याच्या वक्तव्याची चर्चा..., राजकारण्यांबद्दल अभिनेत्याच्या वक्तव्याने वेधलं सर्वांचं लक्ष
अभिनेता सोनू सूद याला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. अभिनेता कायम त्याच्या वक्तव्यांमुळे आणि कामामुळे चर्चेत असतो. दरम्यान, सोनू सूद राजकारणात प्रवेश करेल अशा चर्चांनी देखील जोर धरला होता. पण आपण कोणत्याच पक्षात प्रवेश करणार नाही… असं वक्तव्य करत अभिनेत्याने रंगणाऱ्या चर्चांना पूर्णविराम लावला होता. पण आता नुकताच अभिनेत्याने राजकारणी व्यक्तींबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सोनू सूद पुन्हा चर्चेत आला आहे.
सांगायचं झालं तर, नुकताच अभिनेत्याने एक्सवर आस्क सोनू सूद सेशनच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधला. सेशन दरम्यान एका नेटकऱ्याने अभिनेत्याला ‘भारतात कोणते बदल होण्याची गरज आहे?’ असा प्रश्न विचारला… या प्रश्नाचं अभिनेत्याने दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आहे.
नेटकऱ्याच्या प्रश्नाचं उत्तर देत अभिनेता म्हणाला, ‘राजकाण्यांच्या भरवश्यावर राहू नका… सामान्य लोकांनीही जीवन बदलण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे…’ सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या वक्तव्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनू सूद याची चर्चा रंगली आहे.
सोनू सूद याचे आगामी सिनेमे
सोनू सूद सध्या आगामी ‘फतेह’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमातून सोनू देखील दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचा टीझर रिलीज झाला होता, ज्यामध्ये सोनू सूद दमदार ॲक्शन करताना दिसत होता. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या आगामी सिनेमाची चर्चा रंगली आहे. सिनेमात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीज देखील मुख्य भूमिकेत आहे.
सामान्य जनतेचा रियल हिरो म्हणजे सोनू सूद
सोनू सूद याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने कोरोना काळात अनेकांची मदत केली. ज्यामुळे अभिनेता तुफान चर्चेत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील अनेकांनी सोनू सूद याच्याकडे मदतीची मागणी केली. अभिनेत्याने देखील शक्य तेवढ्या गरजूंची मदत केली. ज्यामुळे अभिनेता सामान्य जनतेचा रियल हिरो ठरला.. आज देखील अभिनेता अनेकांच्या मदतीसाठी धावत जातो…
अभिनेता सोनू सूद याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच मनोरंजन केलं. सोशल मीडियावर देखील अभिनेता कायम सक्रिय असतो. चाहते देखील अभिनेत्याच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनू सूद याची चर्चा रंगली आहे.