Swara Bhaskar | ब्रिजभूषण सिंह यांच्या जामिनावर संतापली स्वरा भास्कर, थेट केला सरकारवर हल्ला, म्हणाली

| Updated on: Jul 18, 2023 | 7:46 PM

बाॅलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे. स्वरा भास्कर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून स्वरा भास्कर ही तिच्या चित्रपटांमुळे नाही तर तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे.

Swara Bhaskar | ब्रिजभूषण सिंह यांच्या जामिनावर संतापली स्वरा भास्कर, थेट केला सरकारवर हल्ला, म्हणाली
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे स्वरा भास्कर ही तिच्या चित्रपटांमुळे नाही तर तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपण कोर्टामध्ये लग्न केल्याचे स्वरा भास्कर हिने जाहिर केले. समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमद (Fahad Ahmed) याच्यासोबत कोर्ट मॅरेज स्वराने केले. स्वराने लग्न केल्याचे जाहिर करताच अनेकांनी तिला टार्गेट करण्यास सुरूवात केले. अगोदर कोर्टात लग्न आणि नंतर हिंदू रितीरिवाजाने स्वरा आणि फहाद यांचे लग्न (Marriage) झाले. विशेष म्हणजे दिल्लीमध्ये खास पार्टीचे आयोजन देखील करण्यात आले.

लग्नच नाही तर आता स्वरा भास्कर ही लवकरच तिच्या बाळाला जन्म देणार आहे. स्वरा भास्कर हिने काही दिवसांपूर्वी आई होणार असल्याचे जाहिर केले. यासोबतच तिने काही फोटोही शेअर केले. लग्न होण्याच्या अगोदरच स्वरा भास्कर ही प्रेग्नेंट होती. सोशल मीडियावर स्वरा भास्कर ही कायमच सक्रिय असून नेहमीच खास पोस्ट शेअर करताना दिसते.

नुकताच आता स्वरा भास्कर हिने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. याच पोस्टमुळे आता स्वरा भास्कर ही चर्चेत आलीये. स्वरा भास्कर हिने पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. ब्रिजभूषण सिंह आणि अन्य आरोपींना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आल्याने स्वरा भास्कर ही भडकली आहे.

स्वरा भास्कर हिने पोस्ट शेअर करत म्हटले की, शिक्षक, विद्यार्थी, कार्यकर्ते आणि राजकीय मतभेद असलेल्या लोकांना कधीच जामीन मिळत नाही. परंतू दुसरीकडे लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना खुली सुट नव्या इंडियामध्ये देण्यात आलीये. आता स्वरा भास्कर हिची ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

विषय कोणत्याही असो कायमच आपले मत मांडताना स्वरा भास्कर ही दिसते. स्वरा भास्कर ही सोशल मीडियावर सक्रिय असून अनेक विषयांवर पोस्ट शेअर करते. विशेष म्हणजे सोशल मीडियावर तगडी फॅन फाॅलोइंग ही स्वरा भास्कर हिची बघायला मिळते. स्वरा भास्कर ही शेवटी जहां चार यार या चित्रपटामध्ये दिसली होती.