तृप्ती डिमरीच्या चाहत्यांसाठी ‘Bad Newz’, लग्नाआधी अभिनेत्री प्रेग्नेंट? बेबी बम्प समोर

Triptii Dimri | तृप्ती डिमरी लग्नाआधी प्रेग्नेंट? बेबी बम्प समोर... फोटो पाहून तुम्ही देखील म्हणाल..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तृप्ती डिमरी हिची चर्चा... 'ॲनिमल' सिनेमामुळे एका रात्रीत प्रकाश झोतात आलेली तृप्ती सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत... नक्की काय आहे प्रकरण...

तृप्ती डिमरीच्या चाहत्यांसाठी ‘Bad Newz’, लग्नाआधी अभिनेत्री प्रेग्नेंट? बेबी बम्प समोर
Follow us
| Updated on: Mar 20, 2024 | 10:17 AM

मुंबई | 20 मार्च 2024 : अभिनेता रणबीर कपूर स्टारर ‘ॲनिमल’ सिनेमात अभिनेत्री तृप्ती डिमरी (Triptii Dimri) हिची फार लहान भूमिका होती. पण त्याच भूमिकेमुळे तृप्ती हिला बॉलिवूडमध्ये लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली आहे. ‘ॲनिमल’ सिनेमानंतर तृप्ती हिचं नशीबच चमकलं. नॅशनल क्रश म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलेली तृत्ती आता तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तृप्ती डिमरी हिची चर्चा रंगली आहे. तृप्तीचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीचे बेबी बम्प दिसत असल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

अभिनेत्रीचा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना देखील प्रश्न पडला आहे. सांगायचं झालं तर, सध्या अभिनेत्रीचा जो फोटो व्हायरल होत आहे तो फोटो तृप्तीच्या आगामी सिनेमाचा पोस्टर आहे. तृप्तीच्या आगामी सिनेमाचं नाव ‘बॅड न्यूज’ (Bad Newz) असं आहे. नुकताच सिनेमाचा पोस्टर प्रदर्शित करत तृप्तीने आगामी सिनेमाची घोषणा केली आहे.

हे सुद्धा वाचा

सध्या सोशल मीडियावर सर्वत्र विकी कौशल कौशल (Vicky Kaushal), तृप्ती डिमरी आणि एम्मी विर्क (Ammy Virk) यांच्या आगामी सिनेमाचा पोस्टर व्हायरल होत आहे. पोस्टरमध्ये तृप्ती प्रेग्नेंट दिसत आहे. तिघांना एकत्र पोस्टरमध्ये पाहिल्यानंतर चाहते देखील हैराण झालं आहेत. तृप्तीच्या बाळाचा बाप कोण? असे प्रश्न चाहते कमेंट सेक्शनमध्ये विचारत आहेत.

पोस्टरवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘तुम्ही काहीही करता…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘बॅड न्यूज देखील बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करेल…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘माझी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तृप्ती – विकी यांच्या आगामी सिनेमाची चर्चा रंगली आहे.

विकी कौशल, तृप्ती डिमरी स्टारर सिनेमा 19 जुलै 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. पोस्टर पाहिल्यानंतर चाहत्यांच्या मनात सिनामाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘बॅड न्यूज’ सिनेमातून तृप्ती आता चाहत्यांचं किती मनोरंजन करेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तृप्ती हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या मोठ्या संख्येने वाढली आहे. ‘ॲनिमल’ सिनेमाच्या यशानंतर चाहत्यांच्या संख्येत वाढ झाली याचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने केला होता. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.