Twinkle Khanna | 48 व्या वर्षी काॅलेजमध्ये शिक्षणाचे धडे घेताना दिसली ट्विंकल खन्ना, अभिनेत्रीचा मोठा खुलासा

| Updated on: Jun 11, 2023 | 5:45 PM

बाॅलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना ही गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, असे असताना देखील ट्विंकल खन्ना ही आपल्या चाहत्यांच्या संपर्कात कायमच असते. ट्विंकल खन्ना ही सोशल मीडियावर अनेकदा फोटो आणि व्हिडीओ हे शेअर करताना दिसते.

Twinkle Khanna | 48 व्या वर्षी काॅलेजमध्ये शिक्षणाचे धडे घेताना दिसली ट्विंकल खन्ना, अभिनेत्रीचा मोठा खुलासा
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) ही नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही वर्षांपासून ट्विंकल खन्ना ही बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. अभिनेता अक्षय कुमार याच्यासोबत 2001 मध्ये ट्विंकल खन्ना हिचे लग्न झाले आणि लग्न (Marriage) झाल्यापासूनच ट्विंकल खन्ना हिने चित्रपटांना कायमचा रामराम केलाय. मात्र, असे असताना देखील ट्विंकल खन्ना ही नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. सोशल मीडियावर (Social media) देखील ट्विंकल खन्ना ही सक्रिय असते. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मोठे खुलासे करताना ट्विंकल खन्ना ही दिसली होती. इतकेच नाही तर ट्विंकल खन्ना हिने स्पष्ट केले की, तिला अजिबात काहीही स्वयंपाक करता येत नाही.

ट्विंकल खन्ना ही सोशल मीडियावर नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी काही खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. असे म्हणतात ना…शिक्षणासाठी कोणतेच वय नसते. आपण कोणत्याही वयामध्ये शिक्षण घेऊन विद्यार्थी होऊ शकतो… विशेष म्हणजे 48 व्या वर्षी ट्विंकल खन्ना ही विद्यार्थ्यांचे आयुष्य जगताना दिसत आहे.

नुकताच ट्विंकल खन्ना हिने एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ट्विंकल खन्ना ही चक्क लंडनमध्ये काॅलेज लाईफ जगताना दिसत आहे. मित्रांसोबत काॅफी पिताना देखील ट्विंकल खन्ना ही दिसत आहे. आता ट्विंकल खन्ना हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

ट्विंकल खन्ना हिने व्हिडीओ शेअर करत म्हटले की, 50 व्या वर्षी या पृथ्वीवर विद्यापीठात परत जाण्यासारखे काय आहे? मी क्लासला उपस्थित राहून 9 महिने झाले आहेत आणि मी मास्टर्स पूर्ण करण्याच्या शेवटच्या टप्प्यात असताना माझ्यावर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. कोणाला वाटले होते की, मी सबमिशन आणि ग्रेडमध्ये बिझी राहिल.

लेक्चर्सवर लक्ष देण्यासाठी मी हजारो कॉफी घेते. कधी कधी मला वाटते की मी विचित्र जीवन निवडीमध्ये मास्टर्ससाठी अर्ज करायला हवा होता…दुसरीकडे मला हे नवीन अनुभव येणार नाहीत आणि विद्यापीठाची गॅंग नसेल. आता ट्विंकल खन्ना हिची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या वयात ट्विंकल खन्ना ही नेमके का शिक्षण घेत आहे असेही अनेकांनी विचारले आहे. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार याचा चित्रपट रिलीज झाला होता.