Rishabh Pant ला डेट करतेय ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री? वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

Rishabh Pant Love Life: ऋषभ पंत याच्या आयुष्यात बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री? अभिनेत्रीच्या 'त्या' वक्तव्यामुळे चर्चांना उधाण... ऋषभ पंत कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे असतो चर्चात...

Rishabh Pant ला डेट करतेय 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री? वक्तव्यामुळे चर्चांना उधाण
Follow us
| Updated on: Oct 31, 2024 | 8:28 AM

Rishabh Pant Love Life: भारतीय क्रिकेटर आणि बॉलिवूड अभिनोत्री यांच्या फार खास नातं आहे. अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी अभिनेत्रींना डेट केलं आहे. अनेकांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं. तर काहींचं ब्रेकअप झालं. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत ऋषभ पंत याच्या नावाची चर्चा सुरु आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री उर्वशी रौतेला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ऋषभ आणि उर्वशी यांच्या नात्याची चर्चा सुरु आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत उर्वशी रौतेला हिला खासगी आयुष्यावर आणि ऋषभ पंत याच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘लोकं हात धुवून माझ्या आणि ऋषभच्या मागे का लागले आहेत? हे सर्वांत आधी मला विचारायचं आहे. प्रकरणाची चर्चा वाऱ्यासारखी होत आहे आणि यासाठी मी माध्यमांना जबाबदार धरत आहे… मला असं वाटतं यावर आणखी चर्चा व्हायला नको…’ असं उर्वशी म्हणाली.

उर्वशीच्या एका वक्तव्यामुळे वाद…

काही वर्षांपूर्वी उर्वशीने मुलाखतीत एक वक्तव्य केलं होतं, ज्यामुळे वाद निर्माण झाले होते. ‘मी दिल्लीत शुटिंग करत होती. रात्री मी दिल्लीत पोहोचली होती. मला सकाळी लवकर तयार व्हायचं होतं. कारण अभिनेत्रींना तयार होण्यासाठी अधिक वेळ लागतो… मिस्टर आरपी हॉटेलच्या लॉबीमध्ये माझे प्रतीक्षा करत होते. त्यांना मला भेटायचं होतं. पण मी झोपली होती. 10 तास होऊन गेले होते. पण मी त्यांचा फोन उचलू शकले नाही. उठल्यानंतर पाहिलं तर 16 – 17 मिसकॉल होते… त्यांना मला भेटायचं होतं आणि मी भेटू शकले नाही… हाच विचार करुन मला वाईट वाटत होतं…’

सांगायचं झालं तर, दोन वर्षांपूर्वी उर्वशीने असं वक्तव्य केलं होतं. ऋषभ पंतच्या नावाचं पहिलं अक्षर ‘RP’ आहे, त्यामुळे तेव्हापासून उर्वशी- ऋषभच्या नात्याच्या अफवांना जोर धरला होता. एवढंच नाही तर, ऋषभ पंत याच्या अपघातानंतर देखील उर्वशीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चिंता व्यक्त केली होती. ज्यामुळे दोघांच्या नात्याला उधाण आलं होतं.

उर्वशी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण इतर अभिनेत्रींप्रमाणे बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करू शकली नाही. उर्वशी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.