नवऱ्याच्या निधनानंतर सासूने हडपली संपत्ती, नाही झालं नवऱ्याचं अंतिम दर्शन, अभिनेत्रीचं खडतर आयुष्य

Bollywood Actress love life: अभिनेत्रीला शेवटच्या क्षणी देखील नाही पाहाता आला नवऱ्याचा चेहरा, त्याच्या निधनानंतर सासूने हडपली संपत्ती..., अभिनेत्रीने बॉलिवूडवर केलं राज्य, पण खासगी आयुष्यात सोसल्या यातना...

नवऱ्याच्या निधनानंतर सासूने हडपली संपत्ती, नाही झालं नवऱ्याचं अंतिम दर्शन, अभिनेत्रीचं खडतर आयुष्य
Follow us
| Updated on: Nov 10, 2024 | 1:02 PM

Bollywood Actress love life: बॉलिवूड अभिनेत्री कायम त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल चाहत्यांना सांगत असते. बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत, ज्या प्रोफेशनल आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहोचल्या, पण खासगी आयुष्यात त्यांनी अनेक चढ – उतारांचा सामना करावा लागला. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणदे झीनत अमान… झीनत यांनी देखील खासगी आयुष्यात अनेक समस्यांचा सामना केला. झीनत यांनी दोन वेळा लग्न केलं. पण त्यांचे दोन्ही लग्न अपयशी ठरले. तर फक्त मुलासाठी त्यांनी 12 वर्ष यातना सहन केल्या. स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल खुद्द झीनत यांनी मोठा खुलासा केला.

झीनत यांच्या पहिल्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, त्यांचं पहिलं लग्न 1978 मध्ये अभिनेते आणि फिल्म मेकर संजय खान यांच्यासोबत झालं होतं. पण त्याचं लग्न एक वर्ष देखील टीकलं नाही. नवऱ्याकडून अभिनेत्रीचा सतत शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. यानंतर अभिनेत्रीने संजय खानपासून घटस्फोट घेतला. 1985 मध्ये झीनत यांनी मजहर खानसोबत दुसरं लग्न केलं. दुसऱ्या लग्नातही त्यांना वैवाहिक आयुष्याचा आनंद मिळाला नाही.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Zeenat Aman (@thezeenataman)

एका मुलाखतीत झीनत यांनी मजहर खान सोबत लग्न केल्यानंतर आलेल्या अडचणींबद्दल सांगितलं. झीनत म्हणाल्या, ‘लग्नाच्या काही वर्षांनंतर मला कळलं की मी चुकीचा निर्णय घेतला आहे. पण कुटुंबियांच्या विरोधात जात लग्न केल्यामुळे मी लग्न टिकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला…’

‘गरोदर राहिल्यानंतर देखील नवऱ्याने माझी साथ दिली नाही.’ एक मॅगझीनच्या आर्टिकलनुसार, मजहर यांचं दुसऱ्या महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते आणि हे सत्य देखील होतं. ‘नवऱ्याच्या प्रेमसंबंधांबद्दल कळल्यानंतर मला मोठा धक्का बसला. पण मुलाचा जन्म झाल्यानंतर मी लग्न टिकवण्याचा निर्णय घेतला. पण तेव्हा देखील मजहर याची वगणूक बदलत नव्हती…’

एवढंच नाही तर, मजहरपासून वेगळं झाल्यानंतरही मला माझ्या सासरच्या लोकांकडून खूप त्रास सहन करावा लागला. मजहरच्या आई आणि बहिणीने माझ्या मुलाला माझ्या विरुद्ध केलं होतं. जेव्हा मजहरचा मृत्यू झाला तेव्हा सासरच्यांनी तिला तिच्या पतीचा चेहराही पाहू दिला नाही. शिवाय मजहर यांची सर्व प्रॉपर्टी आई आणि बहिणीने घेतली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.