ऐश्वर्या राय हिच्यापेक्षाही आराध्या बच्चनकडे लोकांच्या नजरा, ‘ते’ फोटो व्हायरल होताच, लोक म्हणाले..
बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय ही सध्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये पोहचली आहे. आता या फिल्म फेस्टिवलमधील अनेक फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या रायने मोठा काळ गाजवला आहे. आपल्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये ऐश्वर्या रायने अनेक हिट चित्रपट दिली आहेत. ऐश्वर्या राय सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना ऐश्वर्या राय दिसते. ऐश्वर्या रायने अभिनय आणि जाहिरातीमुळे बक्कळ पैसा कमावला आहे. नुकताच ऐश्वर्या राय ही ‘कान्स फिल्म फेस्टिवल’मध्ये पोहचली आहे.
ऐश्वर्या राय हिच्या हाताला दुखापत झालीये. या दुखापतीनंतरही ऐश्वर्या राय ही कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये पोहचली. विशेष म्हणजे या कान्स फिल्म फेस्टिवलला ऐश्वर्या राय हिच्यासोबत तिची मुलगी आराध्या बच्चन देखील गेलीये. ऐश्वर्या राय हिचे विमानतळावरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.
यावेळी ऐश्वर्या राय हिच्या हाताला दुखापत झाल्याचे बघायला मिळाले. हाताला दुखापत असताना देखील ऐश्वर्या राय ही कान्सच्या रेड कार्पेटमध्ये सहभागी झाली. या फोटोंमध्ये ऐश्वर्या रायच्या हाताला प्लॅस्टर देखील दिसत आहे. ऐश्वर्या राय हिच्या हाताला दुखापत झाल्याने आराध्या बच्चन ही तिची काळजी घेताना दिसत आहे. हॉटेलच्या बाहेर आईचा हात धरून तिची काळजी घेताना आराध्या बच्चन दिसतंय.
हेच नाही तर रेड कार्पेटमध्ये ऐश्वर्या जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे. याचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. लोक या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करून आराध्या बच्चन हिचे काैतुक करताना दिसत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या 12 वर्षांची आहे. ऐश्वर्याने आराध्याला चांगले संस्कार दिल्याचे काहींनी म्हटले.
विशेष म्हणजे तब्बल गेल्या 22 वर्षांपासून ऐश्वर्या राय ही कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी होतंय. ऐश्वर्या राय हिच्या लूकपेक्षाही लोकांच्या नजरा आराध्या बच्चन हिच्याकडे दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा आहे की, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये वाद सुरू आहे. हेच नाही तर यांच्यामधील वाद टोकाला गेलाय. मात्र, यावर अजूनही बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही काहीही भाष्य केले नाहीये.